मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानंतर राज्यभरात जल्लोष केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व शिवप्रेमींचे अभिनंदन करत हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर यासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष सहकार्य केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"जगभरातील शिवप्रेमींचे अभिनंदन करतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महारांजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित करण्याकरिता निवडले होते. पंतप्रधान मोदींकडे सात वेगवेगळ्या साईट्स या जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडण्याकरिता गेल्या होत्या. त्यापैकी पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले निवडण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
"या 12 किल्ल्यांच्या संदर्भातील स्थापत्य हे वेस्टर्न घाट, जंगल अशा नैसर्गिक विविधतेत कशाप्रकारे त्याचे स्थापत्य करण्या आले या सगळ्या गोष्टी युनेस्को समोर ठेवल्या. केले. यामध्ये वर्षभर त्यांची कमिटी येऊन त्यांनी सर्व किल्ल्यांची पाहणी केली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एक टीम तिकडे युनेस्कोमध्ये गेली, त्यांनी प्रेझेंटेशन केले. वीस देशांच्या राजदूतांना यामध्ये मतदानाचा अधिकार आहे. त्यांना मतदान करण्यासाठी मी स्वतः चर्चा केली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही बोलले. आम्ही पंतप्रधान मोदींनाही विनंती केली. या वीसही देशांनी आपल्या बाजूने मतदान केले आणि एकमताने जागतिक वारसा म्हणून नोंद झाली. हे सर्व शिवप्रेंमींचे यश आहे," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार?
आत्ता नवी मुंबई विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी याठिकाणी आलो आहे. याची भैतिक प्रगती ही ९४ टक्के झाली आहे. रनवे पूर्णता तयार आहे. बाकी सर्व काम अत्यंत वेगाने चालले आहे. 9 कोटी प्रवाशांसाठी हा विमानतळ सुसज्ज होणार आहे. यामध्ये ३७ मेगा व्हॅट ग्रीन वीज वापरली जाणार आहे. यामध्ये सर्व गाड्या इलेक्ट्रिक असणार आहेत. प्रवाशांना विमानतळावर पोहोचणे सोपं जाईल अशी व्यवस्था केली जात आहे. देशातील सर्वात आधुनिक असं हे विमानतळ असेल. आज आम्ही त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत हे काम पुर्ण करण्याचे टार्गेट दिलं आहे. याकाळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.