Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय! CM फडणवीसांच्या खेळीने एकनाथ शिंदेंचा मार्ग मोकळा

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंत्रिमंडळ बैठकीतील तीन मोठे निर्णय

✅ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाईल.

✅  जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन

✅  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती करणार

नक्की वाचा - Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!

दरम्यान, आज झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील आपत्ती ्व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते, त्यामुळे महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती.

Advertisement

मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत दुरुस्ती करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या समितीमध्ये राहणार आहेत.