Baramati Election: मुंडेंचा फोन, CM फडणवीसांचा शब्द अन् काँग्रेसची माघार; पडद्यामागे काय घडलं?

शेवटी अखेरच्या क्षणी घडलेल्या घडामोडींनंतर काँग्रेसने माघार घेतली. या माघार घेण्यामागे धनंजय मुंडेंनी यशस्वी मध्यस्थी केल्याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Baramati by Election 2026: अनेक नाट्यमय घडामोडीनंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार दिल्याने या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली होती. आकाश मोरे यांची उमेदवारी माघार घेण्याबाबत राष्ट्रवादीकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती, मात्र काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम होते. शेवटी अखेरच्या क्षणी घडलेल्या घडामोडींनंतर काँग्रेसने माघार घेतली. या माघार घेण्यामागे धनंजय मुंडेंनी यशस्वी मध्यस्थी केल्याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. 

नेमकं काय घडलं? 

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सकाळीच पवार परिवाराकडून या निवडणुकीतून काँग्रेस पक्षाने माघार घ्यावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या गटाकडून धनंजय मुंडे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधावा अशी सूचना करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे हे  श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या सत्ता सांगतासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र जाणार होते. याचवेळी या विषयाला अधिक गती आली.

Advertisement

Nashik News: AI च्या मदतीने बनला 'पोलीस'; वर्दीचा रुबाब दाखवून महिलांना लुटायचा, कसा अडकला जाळ्यात?

मुंडेंचा फोन, CM फडणवीसांचा आवाज...

धनंजय मुंडे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना निवडणुकीतून  माघार घ्यावी अशी विनंती करण्यासाठी स्वतः च्या मोबाईलवरुन फोन लावला व त्याच वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो फोन घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली. धनंजय यांची विनंती तर आहेच पण मी सुद्धा आपल्याला विनंती करतो व अजित दादांच्या अपघात प्रकरणी योग्य तपास केला जाईल असा शब्द देतो, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिले. राज्याचे  मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या या विनंतीला मान देऊन बारामती विधानसभा पोट निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय झाला.

 विशेष म्हणजे आज धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे दोघेही संतश्रेष्ठ वामन भाऊंच्या नामसपत्याच्या समारोपासाठी निघालेले असताना त्यांना याबाबत सूचना मिळाली व सत्याचा समारोप होईपर्यंत त्यांनी हातात घेतलेल्या मोहिमेला यश मिळाले. बारामतीकरांच्या प्रेमाची उतराई होण्याची संधी धनंजय मुंडेंना या निमित्ताने भेटली आहे व धनंजय मुंडे हे या निवडणुकीत मतदानाच्या पूर्वीच सुनेत्राताई पवारांसाठी संकटमोचक ठरले. विशेष म्हणजे स्वतः सुनेत्राताई पवारांनी सुद्धा याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता एकंदरीत या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेत बारामतीच्या पवारांच्या मदतीला बीडकरांचे प्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडे हुकमाचा माणूस म्हणून मदतीला आल्याचे पाहायला मिळाले. 

Nagpur News: पतीने किचनमध्ये जाण्यापासून रोखलं... पत्नीने कोर्टात खेचलं, न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल