शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील वाद चव्हाट्यावर; माजी खासदार गोपाळराव पाटीलांचे गंभीर आरोप

गेल्या 56 वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या या शिक्षणसंस्थेत सध्या वाद सुरू झाला आहे. सचिव असलेले अनिरुद्ध जाधव आणि इतर संचालकांनी आता आम्ही बैठक घेऊन करण्यात आलेल्या आरोपांवर माहिती देऊ असं म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील कांबळे, लातूर

शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेत सुरू असलेला वाद आज चव्हाट्यावर आला. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून संस्थेत सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहराचा भांडाफोड केला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संस्थेने खरेदी केलेली जमीन आणि पदभरतीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप डॉ. गोपाळराव पाटील यांनी संचालक मंडळावर केला आहे. आपणाला विश्वासात न घेता बँकांमध्ये जुन्या खात्यांऐवजी नवीन खाते उघडून त्यावरून व्यवहार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान पत्रकार परिषद घ्यायला संस्थेच्या सभागृहाकडे निघालेल्या अध्यक्षांना गेटवरच अडवण्यात आले होते. गेट बंद करून घेतल्याने डॉ. गोपाळराव पाटील यांनी सोबत असलेल्या तीन सदस्यांसह गेटवरच  पत्रकार परिषद घेतली. 

(नक्की वाचा-  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय)

गेल्या 56 वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या या शिक्षणसंस्थेत सध्या वाद सुरू झाला आहे. सचिव असलेले अनिरुद्ध जाधव आणि इतर संचालकांनी आता आम्ही बैठक घेऊन करण्यात आलेल्या आरोपांवर माहिती देऊ असं म्हटलं आहे. संस्थेने खोपेगाव इथे खरेदी केलेल्या जमिनीसाठी रेडिरेकनरपेक्षा 200 पट  किंमत देण्यात आली, असाही गंभीर आरोप संस्थेचे सदस्य आणि माजी प्राचार्य आर. एल. कावळे यांनी यावेळी केला. 

Advertisement

(नक्की वाचा- मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती)

कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांमुळे आजपर्यंत यशस्वीपणे वाटचाल करणारी ही संस्था चर्चेत आली आहे. या संस्थेच्या संचालक मंडळात वर्षानुवर्षे ठान मांडून बसलेली मंडळी आताही पद सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या संस्थेकडे असलेल्या अनेक शाळा, महाविद्यालये आणि युनिटमध्ये खरच फायदा आहे का?असाही सवाल आता केला जातो आहे.

Advertisement
Topics mentioned in this article