Dashavatar Movie Box Office Collection: दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'ने आतापर्यंत किती कोटी कमावले ?

Dashavatar Movie Box Office Collection: शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी 'दशावतार', 'बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार' हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Dashavatar vs Aarpar vs Bin Lagnachi Goshta Box Office Collection: यंदाचा विकएंड मराठी चित्रपटांसाठी खासकरून दशावतार या दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटासाठी अत्यंत उत्तम ठरला आहे. 13 सप्टेंबरला शनिवार होता आणि 14 सप्टेंबरला रविवार होता. या विकएंडला मराठी चित्रपटांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. मराठी रसिकांसह चित्रपट समीक्षकांची नजर दशावतार चित्रपटावर असून विकएंडला या चित्रपटाने किती कमाई केली याबद्दलची मराठी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे. शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी 'दशावतार'सह तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटांचाही समावेश होता.  

नक्की वाचा: 'दशावतार' हिट झाला का फ्लॉप? आकडे पाहून आश्चर्य वाटेल

'बिन लग्नाची गोष्ट'ने आतापर्यंत किती कमाई केली (Bin Lagnachi Goshta Box Office Collection)

शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला बिन लग्नाची गोष्ट प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयांची कमाई केली होती. शनिवारी म्हणजे 13 सप्टेंबरला या चित्रपटाने 18 लाख रुपयांची कमाई केली होती. रविवारी म्हणजेच 14 सप्टेंबरला 'बिन लग्नाची गोष्ट'ने 27 लाख रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून 53 लाखांची कमाई केली आहे. 

'आरपार'ने आतापर्यंत किती कमाई केली (Aarpar Box Office Collection)

बिन लग्नाची गोष्टच्या तुलनेत आरपार या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला या चित्रपटाने 12 लाखांची कमाई केली होती. शनिवारी म्हणजेच 13 सप्टेंबरला या चित्रपटाने 19 लाखांची कमाई केली तर  रविवारी म्हणजेच 14 सप्टेंबरला  या चित्रपटाने 29 लाख रुपयांची कमाई केली होती. एकूण मिळून या चित्रपटाने 60 लाखांची कमाई केली आहे. 

नक्की वाचा: Gemini AI Saree Photos Trend: मराठमोळ्या अभिनेत्रींचे रेट्रो साडी लुकमधील 12 फोटो पाहून म्हणाल: चांद तू नभातला

दशावतार चित्रपटाची दणदणीत कामगिरी (Dashavatar Box Office Collection)

शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला दशावतार चित्रपट प्रसिद्ध झाला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतर मराठी चित्रपटांच्या तुलनेत उत्तम कामगिरी केली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 58 लाखांची कमाई केली होती. इतर दोन मराठी चित्रपटांनी तीन दिवसांत केलेली कमाई या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली होती. शनिवारी म्हणजेच 13 सप्टेंबरला या चित्रपटाने 1.39 कोटींची कमाई केल्याचे Saclink या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी देणाऱ्या वेबसाईटने म्हटले आहे. रविवारी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजीही या चित्रपटाची घोडदौड सुरूच राहिली. रविवारी या चित्रपटाने 2.72 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर आतापर्यंत 4.69 कोटींची कमाई केली आहे. 

Advertisement

तगडी स्टारकास्ट असलेले तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले

बिन लग्नाची गोष्टमधून उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी (Umesh Kamat and Priya Bapat Movie) पुन्हा एकदा चित्रपटात पाहायला मिळते आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटा गिरीश ओक, निवेदिता सराफ, संजय मोने, सुकन्या मोने हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नितीन वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून आदित्य इंगळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असलेला आरपार हा मराठी चित्रपट देखील शुक्रवारी प्रदर्शित झाला. माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, स्नहलता वसईकर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. गौरव पत्की हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर दशावतार या चित्रपटामध्ये  दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात महेश मांजरेकर,भरत जाधव,सिद्धार्थ मेनन,प्रियदर्शिनी इंदलकर,विजय केंकरे,रवी काळे,अभिनय बेर्डे,सुनील तावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.