
Dashavatar vs Aarpar vs Bin Lagnachi Goshta Box Office Collection: शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. दशावतार (Dashavatar Marathi Movie) आरपार (Aarpar Marathi Movie) आणि बिन लग्नाची गोष्ट (Bin Lagnachi Goshta Marathi Movie) असे तीन तीन चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले आहेत. एकीकडे मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याची बोंब ऐकायला मिळत असताना एकाच दिवशी तीन चित्रपट प्रदर्शित करण्याचा या तीनही चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी निर्णय का घेतला असा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे या चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केलीय, आणि कोणता चित्रपट कमाईच्या बाबतीत सुमार ठरलाय याची लोकांमध्ये उत्सुकता आहे.
नक्की वाचा: मनोरंजनाचा डबल धमाका, 2 नव्या मालिका 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
'बिन लग्नाची गोष्ट'ला कसा मिळतोय प्रतिसाद?
बिन लग्नाची गोष्टमधून उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी (Umesh Kamat and Priya Bapat Movie) पुन्हा एकदा चित्रपटात पाहायला मिळते आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटा गिरीश ओक, निवेदिता सराफ, संजय मोने, सुकन्या मोने हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नितीन वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून आदित्य इंगळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सॅकलिंक (sacnilk Bin Lagnachi Goshta box office collection figures) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दलची माहिती देणाऱ्या वेबसाईटवर या चित्रपटाने प्रदर्शनानंतर 8 लाखांची कमाई केल्याचे म्हटले आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालाय.
नक्की वाचा: प्रसाद ओकला बायकोने कानाखाली मारली, अभिनेता थरथरायला लागला, नेमकं काय घडलं?
'आरपार' चित्रपट रसिकांना आवडला का?
ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असलेला आरपार हा मराठी चित्रपट देखील शुक्रवारी प्रदर्शित झाला. माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, स्नहलता वसईकर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. गौरव पत्की हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. सॅकलिंक (sacnilk Aarpar box office collection figures) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13 लाख रुपयांची कमाई केली आहे.
नक्की वाचा: सैयारा ते कुली... या विकेंडला ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी
'दशावतार' चित्रपट हिट झाला का ?
या वर्षीचा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला चित्रपट होता तो म्हणजे दशावतार. तगडी स्टारकास्ट आणि त्यातही दिलीप प्रभावळकरांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट कशी कामगिरी करतो याकडे अनेकांचे लक्ष होते. दिलीप प्रभावळकर यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात महेश मांजरेकर,भरत जाधव,सिद्धार्थ मेनन,प्रियदर्शिनी इंदलकर,विजय केंकरे,रवी काळे,अभिनय बेर्डे,सुनील तावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सॅकलिंक (sacnilk Dashavatar box office collection figures) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने संपूर्ण भारतात 65 लाखांची कमाई केल्याचे दिसून आले आहे. दशावतार हा चित्रपट शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या तीनही चित्रपटांमध्ये निर्विवादपणे वरचढ ठरल्याचे दिसते आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world