Davos WEF 2026: आता तिसरी मुंबई..! दावोसमधून सर्वात मोठी घोषणा; रायगड जिल्ह्यासाठी मोठं गिफ्ट

रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी महाराष्ट्र सरकार (एमएमआरडीए) आणि विविध जागतिक कंपन्यांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Davos World Economic Forum 2026: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या  जागतिक आर्थिक परिषदेसाठी (WEF)  दावोस दौऱ्यावर आहेत. या परिषदेतून महाराष्ट्रासाठी पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींची गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये आयटी, डेटा सेंटर्स, स्टील, लॉजिस्टिक्स आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांचा समावेश असून, मुंबईसह गडचिरोली, पालघर आणि रत्नागिरी यांसारख्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. अशातच आता दावोसमधून रायगडसाठी सर्वात मोठे गिफ्ट  मिळाले आहे. 

रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी महाराष्ट्र सरकार (एमएमआरडीए) आणि विविध जागतिक कंपन्यांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. १,२०० एकरात तिसरी मुंबई उभारण्याचा हा प्लॅन असून यासाठी तब्बल 11 कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Davos Wef 2026: दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका! 14 लाख 50 कोटींचे करार; तुमच्या जिल्ह्यात कोणती कंपनी येणार?

करार करण्यात आलेल्या कंपन्या..

  • हानव्हा ग्रुप, कोरिया प्रजासत्ताक
  • एसएसबी सॉअरवेन आणि स्केफर बाएयू एजी स्वित्झर्लंड
  • एएनएसआर ग्लोबल कॉर्प. प्रायव्हेट लिमिटेड, यूएसए
  • फेडएक्स, यूएसए
  • रिव्हररिसाइकल, फिनलंड/भारत
  • एमजीएसए रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड, दुबई, यूएई, भारत
  • एसजीएसए स्पेसेस होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर/भारत
  • मॅपल ट्री, सिंगापूर/भारत
  • ट्रिबेका डेव्हलपर्स एलएलपी, यूएसए/भारत
  • जे अँड वी इन्फ्रास्ट्रक्चर, सिंगापूर/भारत
  • इंडोस्पेस पार्क एव्हरस्टोन ग्रुप सिंगापूर, सिंगापूर/भारत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना उपस्थित होते. "तिसरी मुंबई" म्हणून कल्पित, हा प्रकल्प तंत्रज्ञान, फिनटेक आणि डेटा सेंटरसाठी पुढील पिढीचे केंद्र म्हणून उदयास येईल आणि भारतातील पहिले समर्पित ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) जिल्हा येथे असेल. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक कंपन्यांना रायगड पेण ग्रोथ सेंटरला एक प्रमुख व्यवसाय आणि गुंतवणूक केंद्र म्हणून विचारात घेण्याचे खुले आमंत्रण दिले.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप कसा सुरु करायचा? काय असते प्रक्रिया? खर्च ते कमाई; वाचा A टू Z माहिती