सुरज कसबे, प्रतिनिधी:
DCM Ajit Pawar Pune Visit: पुण्यातील वाहतूक कोंडीने नागरिकांचे, चाकरमान्यांची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. शहरातील हिंजवडी, चाकण एमआयडीसी परिसरात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असते, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. याच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आजच्या पुणे दौऱ्यात त्यांनी याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळाले.
पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज पुण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील भारत माता चौक परिसराची सुरुवातीला पाहणी करत ,अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली .भल्या पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अधिकारी आणि पोहोचण्याआधीच अजित पवार पोहोचल्याने अधिकाऱ्यांची दमछक झाल्यास बघायला मिळाले. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीवरुन पोलिस आयुक्तांना चांगलेच झापले.
Ajit Pawar: पुण्यात आणखी 3 महानगरपालिका? DCM अजित पवारांची मोठी घोषणा
अजित पवार हे पाहणी करत असतानाच चाकण चौकात पोलिसांनी वाहने अडवून ठेवली होती. यावरुनच अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना सुनावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहने थांबवून का कोंडी केली आहे? सगळी वाहतूक नीट सुरु करा, असं अजित पवार म्हणाले. दादांचा हा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ झाल्याचे पाहायला मिळाले.
Solapur Crime: गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, हत्येचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात खळबळ