Ajit Pawar viral video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला दोन दिवस उलटून गेले. मात्र अजूनही ते आपल्यात नाहीत हे मन मान्य करायला तयार नाही, अशीच परिस्थिती महाराष्ट्रभरातील त्यांच्या चाहत्यांची आहे. महाराष्ट्रभरातून विविध प्रकारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ समोर येत आहेत. अजित पवारांचा कामाचा धडाका काय होता हे या व्हिडिओतून पाहायला मिळतंच. इतका मोकळा, सडेतोड बोलणारा पण तरीही जीव लावणारा नेता महाराष्ट्रातून अकाली निघून गेला. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे.
बारामतीकर तर आम्ही वैभव गमावल्याची भावना व्यक्त करीत आहेत. 'दादा गेले अन् बारामतीचं वैभव गेलं' अशी भावना प्रत्येक बारामतीकराच्या मनात दाटली आहे. दरम्यान एक बारामतीकर सुप्रिया सुळेंना साद घालताना दिसत आहे. दादांच्या अंत्यविधीसाठी राज्यच नाही तर देशभरातून मोठा जनसागर लोटला होता.
दादांवर अंत्यसंस्कार झाला त्यादिवशी एकादशी होती. कित्येक कार्यकर्ते भूक-तहान विसरून दादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी एका व्यक्ती सु्प्रिया सुळेंना दादांची विचारणा करतो. दादा माझ्याकडे नाही म्हणत सुप्रिया सुळे त्याच्यासमोर हात जोडतात. तो पुढे म्हणतो, तो तुमचा भाऊ होता, मात्र आमचा पांडुरंग होता. आज तोच पांडुरंग चितेत आहे, असं म्हणताच सुप्रिया सुळे हतबतपणे जोडतात.
अजित पवारांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्रभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील एक पॉवरफुल आणि प्रभावी नेतृत्व गमावल्याचं दु:ख नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.