Eknath Shinde: 'दाढीवाल्याने उध्वस्त केली महाविकास आघाडी...', एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, ठाकरेंवर हल्ला

जोपर्यंत लाडक्या बहिणी, शेतकरी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही," असे म्हणत दाढीने उध्वस्त केली महाविकास आघाडी असा टोलाही त्यांनी लगावला.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नागरीकांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, रामदास कदम आदी नेत्यांची या सभेला उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली, तसेच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, आज मी मी आभार मानायला आलोय.  एक बार मैने कमिटमेंट की तो ये एकनाथ शिंदे खुद की भी नहीं सुनता. असा हा एकनाथ शिंदे आहे.  तुम्ही भरभरून प्रेम केले. कोकणी माणसाचा विजयात मोठा वाटा आहे.कोकणात 9 जागा लढल्या 8 जिंकल्या, फक्त 80 जागा लढवल्या आणि 60 आमदार निवडून आणले. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण हे जनतेने ठरवलं आहे.." असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

तसेच "तेव्हा म्हणायचे  कोण एकनाथ शिंदे? कोण रामदास कदम? आम्ही कोण आहोत हे दाखवलं. मला हलक्यात घेऊ नका, इथे दाढीवाल्यांची मेजोरीटी आहे.साहित्यिकांना दलाल म्हणता, जनाची नाही मनाची तरी ठेवा. कितीही आरोप करा, शिव्या द्या, जोपर्यंत लाडक्या बहिणी, शेतकरी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही," असे म्हणत दाढीने उध्वस्त केली महाविकास आघाडी असा टोलाही त्यांनी लगावला.

(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)

"दिल्लीतल्या खासदारांनी काय खायचं कुठे जायचं यावर व्हीप लावता. अरे किती अविश्वास दाखवता आपल्या माणसांवर.  कोणाची लाईन कापून तुम्हाला मोठं होता येत नाही, तुम्ही तुमची लाईन वाढवा. असे म्हणत या कोकणाने ऑक्सिजन दिला, शिवसेना मोठी केली. त्यांना काहीही कमी पडू देणार नाही.. असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.