Tribal Ashram : आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमदार, खासदारांची थेट आश्रमशाळेत रवानगी

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारचा नवा संकल्प करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Tribal Ashram School Students : राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांसाठी 'एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत' (Tribal Ashram School) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आणि आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या, गरजा आणि सुधारणा याचा आढावा घेणार आहेत. अद्यापही राज्यातील सर्वच आदिवासींना मुख्य प्रवाहात सामील करता आलेलं नाही. कौशल्य, गुणवत्ता असतानाही केवळ योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आदिवासी समाजातील तरुण मुलं मागे राहतात. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्यासोबत राहून विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis) नवा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके 7 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी येथे मुक्कामी असणार आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारचा नवा संकल्प करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Tiger Killed : वाघांची शिकार करणारी बहेलिया जमात मूळची कुठली? ही टोळी कशी काम करते?

7 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुक्कामी राहणार आहेत. राज्यभरातील 26 आमदार आणि 4 खासदारही स्थानिक पातळीवर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. या उपक्रमाद्वारे शिक्षणाच्या सुविधा, वसतिगृहांची स्थिती, अन्न व पोषण, आरोग्य व्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यावर त्वरित उपाययोजना केली जाणार आहे. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी हा उपक्रम पुढे नेण्याचा सरकारचा मानस आहे. 'एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत' हा उपक्रम फक्त पाहणी करण्यापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रभावी निर्णय घेण्यात येतील, असंही सांगितलं जात आहे. 

Advertisement