मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या x अकाऊंट वरून विशेष माहिती महाराष्ट्राला दिली आहे. त्यात त्यांनी थेट परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशात एकूण परकीय गुंतवणूक आली, त्याच्या जवळपास 40 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास अधिक रस असल्याचे ही पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत ट्वीट करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली आहे. आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही 4,21,929 कोटी रुपये इतकी आहे.
पुढे ते म्हणतात महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा 32 टक्के गुंतवणूक अधिक आली आहे. या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या 10 वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हे रेकॉर्ड आपण पहिल्या 9 महिन्यातच मोडलं होतं. मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.
- 2015-16 : 61,482 कोटी
- 2016-17 : 1,31,980 कोटी
- 2017-18 : 86,244 कोटी
- 2018-19 : 57,139 कोटी
- एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी
- 2020-21 : 1,19,734 कोटी
- 2021-22 : 1,14,964 कोटी
- 2022-23 : 1,18,422 कोटी
- 2023-24 : 1,25,101 कोटी
- 2024-25 : 1,64,875 कोटी