Dhananjay Munde : पाच वर्षांपूर्वी 3 अपत्ये तर यंदा 5 अपत्ये; धनंजय मुंडेंच्या संपत्तीतही 5 पटींनी वाढ

राज्याचे कृषीमंत्री व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दाखल केलेले प्रतिज्ञापत्र सध्या चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्याचे कृषीमंत्री व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दाखल केलेले प्रतिज्ञापत्र सध्या चर्चेत आहे. या प्रतिज्ञापत्रामधील कुटुंबाचा तपशील हा लक्ष्य वेधून घेणारा ठरत आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी आपली पाच अपत्ये असल्याचे म्हटले आहे. वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आदीश्री मुंडे, सिशिव मुंडे, शिवानी मुंडे अशी त्यांची नावे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 2019 साली धनंजय मुंडे यांनी परळीतून निवडणूक जिंकली होती. गेल्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते 3 अपत्यांचे वडील असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती 53.80 कोटी असल्याचे नमूद केले आहे. 2019 साली मुंडे यांची संपत्ती 23 कोटी इतकी होती. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावावर 15 कोटीं 55 लाख 5 हजार 105 रुपयांची विविध वाहने आहेत. यामध्ये बुलेटपासून टँकरपर्यंत एकूण 7 वाहनांचा समावेश आहे तर 7 लाख 3000 रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 31 लाख 78 हजार 675 रुपयांची दोन वाहने आहेत. याबरोबर 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने व 72 हजारांची दीड किलो चांदीचा समावेश आहे.

Advertisement

नक्की वाचा - मराठा- मुस्लिम -दलित एकत्र, जरांगेंचा पुढचा प्लॅन ठरला! 3 नोव्हेंबरला मोठी घोषणा

लोकसभेत बहिणीच्या पराभवाचा भाऊ बदला घेणार ?
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मराठा समाजाच्या आंदोलनाने ढवळून निघालेल्या मराठवाड्यातील लक्ष्यवेधक लढतींमध्ये बीडचा समावेश होता. पंकजा सहज जिंकतील असे अनेकांना वाटत होते मात्र बजरंग सोनावणे यांनी त्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत ही निवडणूक जिंकली होती.

Advertisement

या निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी खांद्याला खांदा लावून प्रचार केला होता. तरीही पंकजा यांचा पराभव झाला होता. बहिणीच्या पराभवाचा बदला धनंजय मुंडे घेणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.  त्यामुळेच परळीची लढत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्येही रंजक बनली आहे.

Advertisement