जाहिरात

मराठा- मुस्लिम -दलित एकत्र, जरांगेंचा पुढचा प्लॅन ठरला! 3 नोव्हेंबरला मोठी घोषणा

मराठा मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत परिवर्तन नक्की होईल असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला.

मराठा- मुस्लिम -दलित एकत्र, जरांगेंचा पुढचा प्लॅन ठरला! 3 नोव्हेंबरला मोठी घोषणा
जालना:

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मुस्लिम धर्मगुरूं बरोबर दलीत नेत्यांबरोबर महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत रणनिती काय असावी यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार आणखी जाती धर्माच्या नेत्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. शिवाय या माध्यमातून मराठा मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत परिवर्तन नक्की होईल असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर येणाऱ्या 3 नोव्हेंबरला समाजाचे कोण उमेदवार असतील याची घोषणा केली जाईल असेही ते म्हणाले. ज्यानंतर बाकीच्यांनी उमेदवारी मागे घ्यायची आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठा- मुस्लिम -दलित हे धर्म परिवर्तनासाठी नाही तर सत्ता परिवर्तनासाठी एकत्र आले असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आता परिवर्तन अटळ आहे असा विश्वास त्यांना दाखवला. अनेक मतदार संघात मराठा मुस्लिम आणि दलित हे निर्णायक आहेत. त्यामुळे समाजाचे उमेदवार पडणारच नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उमेदवार कोण असतील याची अधिकृत घोषणा आपल 3 नोव्हेंबरला करणार आहोत. लोकशाही मार्गाने हा लढा लढणार असल्याचेही जरांगे म्हणाले. गोर गरिबांची लेकरं निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे 75 वर्षात जे झालं नाही ते आता होणार आहे असंही त्यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - 'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं

ज्यांनी मराठा समाजाला हिणवलं. त्यांना डिवचलं. त्यांच्यावर अन्याय केला. अशा लोकांना काही झालं तरी मदत करणार नाही हे आमचं ठरलं आहे असेह ही ते म्हणाले. हा लढा स्वाभिमानाचा लढा आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत. तीन तारखे पर्यंत आणखी काही समजाचे आणि जातीचे लोक आमच्या बरोबर येणार आहे. त्यांनाही आम्ही सामावून घेणार आहोत. शेवटी हा हक्काचा लढा आहे. आरक्षणाला ना मराठा समाजाने विरोध केला आहे ना मुस्लिम समाजाने केला आहे. आमच्या सर्वाचे लक्ष आता परिवर्तन घडवून आणणे हे आहे. 

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान विधानसभेसाठी जे इच्छुक आहेत. त्यांना उमदेवारी अर्ज भरण्याचे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार अर्ज दाखलही करण्यात आले आहेत. आत त्यातील अधिकृत उमेदवार कोण याचा निर्णय जरांगे तीन तारखेला घेणार आहेत. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. शिवाय या निवडणुकीचं भवितव्यही या निर्णयावर आहे. जरांगे हे किती उमेदवार आणि कुठे उभे करतात हे जास्त महत्वाचे आहे. त्याचा फटका कोणाला बसणार यावर सर्व गणितं अवलंबून असतील. राज्यात सध्या मविआ विरुद्ध महायुती अशी लढाई आहे. त्यात जरांगे यांनी आपले उमेदवार उतरवल्यास त्याचा फटका कोणाला बसेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com