Dharashiv News: तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भक्तांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी,कारण काय?

उन्हाळ्याच्या सुट्या आणि त्यात रविवार असल्यामुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशिव:

ओंकार कुलकर्णी 

तुळजाभवानी मंदिरामध्ये रविवारी दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या रांगेत मोठा गोंधळ उडाला. एका लहान मुलाने उलटी केल्याच्या किरकोळ कारणावरून महिला व पुरुष भक्तांमध्ये तीव्र वाद झाला. पाहता पाहता फ्री स्टाईल हाणामारीस सुरुवात झाली. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद जवळपास 15 ते 20 मिनिटांपर्यंत सुरू होता. दर्शन रांगेतील भक्तांमध्ये घालमेल निर्माण झाली. अनेक भाविकांनी संताप व्यक्त करत मोबाइलमध्ये या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. घटनेनंतर सुमारे वीस मिनिटांनी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सुरक्षा गार्ड घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उन्हाळ्याच्या सुट्या आणि त्यात रविवार असल्यामुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र, प्रशासनाकडून रांगेचे नियोजन योग्यरीत्या न झाल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात आला आहे. दर्शन रांगेतील अनेक ठिकाणचे फॅन बंद असल्याने गर्दीमध्ये उकाडा वाढला.  त्यामुळे भाविकांमध्ये चिडचिड निर्माण झाली. उष्णता आणि गर्दी यामुळे काही भक्त अस्वस्थ झाल्याचेही निदर्शनास आले. त्यातूनच त्या लहान मुलाला उलटी झाल्याचं बोललं जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Samantha Prabhu: सामंथा प्रभूने घटस्फोटाच्या 4 वर्षांनी काढून टाकला 'तो' टॅटू! काय होतं त्या टॅटूत?

भाविकांचे म्हणणे आहे की, "मंदिर प्रशासनाकडून रांगेच्या नियोजनात गंभीर त्रुटी आहेत. गर्दीचा अंदाज असूनही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही."संपूर्ण घटनेची चौकशी करून रांगेतील नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करावे, अशी मागणी स्थानिक भाविक व भक्तपरिवारांकडून होत आहे. योग्य नियोजन केल्यास भक्तांना त्याचा त्रास होणार नाही. शिवाय भक्तांनी संयम राखावा असं आवाहन करण्यात आलं आहे.