Dharashiv News: चुकून दानपेटीत पडलेली वस्तू देवाचीच! तुळजाभवानी मंदिर संस्थानचा अजब ठराव, भाविकाला मोठा फटका

एका भाविकाची अंगठी चुकून मंदिरातील दानपेटीत पडली होती. ती परत मिळावी यासाठी भाविकाने अर्ज केला होता, मात्र आता मंदिर संस्थानने याबाबत अजब ठराव करत अर्ज निकाली काढला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, धाराशिव:

TuljaBhavani Temple News:  तुळजाभवानी मंदिर संस्थानने केलेल्या अजब ठरावाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या दानपेटीत चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळणार नाहीत तर त्या दान समजल्या जातील असा भाविकांना लुटणारा अजब ठराव  मंदिर संस्थानने केला आहे. पिंपरी चिंचवडमधील एका भाविकाची अंगठी चुकून मंदिरातील दानपेटीत पडली होती. ती परत मिळावी यासाठी भाविकाने अर्ज केला होता, मात्र आता मंदिर संस्थानने याबाबत अजब ठराव करत अर्ज निकाली काढला आहे. 

दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास परत मिळणार नाही..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजापूरचे आई तुळजाभवानी मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधील भाविक तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. दोन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड मधील सुरज टिंगरे हे तुळजाभवानी मंदिरात आई भवानीमातेच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी टिंगरे यांच्याकडून दानपेटीत पैसे टाकताना हातातील अंगठी चुकून दानपेटीत पडली. 

Sambhajinagar Crime: "मी आता थकलोय...", सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; VIDEO शूट करत म्हटलं...

ही अंगठी परत मिळवण्यासाठी त्यांनी देवस्थान समितीकडे विनंती केली. मात्र  तुळजाभवानी देवीच्या भाविकाची चुकून दानपेटीत पडलेली एक तोळ्याची अंगठी परत द्यायला तुळजाभवानी मंदिर संस्थान तयार नाही. दानपेटीत पडलेल्या अंगठीचा फोटो , कोणत्या दानपेटीत पडली याबाबतची सर्व माहिती देत, सत्यता पडताळून ती परत मिळावी यासाठी अर्जही केला. मात्र मंदिर संस्थानने तो अर्ज निकाली काढत अंगठी परत द्यायला नकार दिला. 

तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा अजब ठराव

तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या दानपेटीत चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही त्या दान समजल्या जातील, असा अजब ठरावही या मंदिर प्रशासनाने केला आहे.मंदिर संस्थानने केलेल्या ठरावामुळे ही अंगठी परत करता येणार नाही असं मंदिर प्रशासनाने टिंगरे यांना लेखी कळवले आहे . मंदिर संस्थांच्या अजब ठरावामुळे देवीच्या दरबारात आलेल्या भाविकांवर संकट ओढवले आहे. या निर्णयाने भाविकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. 

Advertisement

Akola News : अकोल्यात भाजप उमेदवाराला MIM–काँग्रेसचा पाठिंबा? छुप्या युतीची पुन्हा जोरदार चर्चा