शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं होतं, दरम्यान आज २१ जूनरोजी धाराशिवमध्ये सार्वजनिकपणे त्यांनी आपली भूमिका मांडली.
ओमराजे निंबाळकरांनी काय घेतला निर्णय?
आज धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सांगितलं की, ते ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटासोबत जाणार आहेत. पैशासाठी ओमराजे कधीही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. हे माझं वैयक्तिक काम नाही. याशिवाय माझ्यावर ईडी आणि सीबीआयची धाड पडली असंही नाही. मी सामान्य माणसात काम करणारा आहे, असं ते यावेळी म्हणाले.
Advertisement
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
- महायुती सत्तेत आहे. आमच्या भागातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. बॅरेजेसचं काम प्रलंबित आहे. शिंदे यांच्यासोबत जाण्याबाबत आम्ही सर्वांची मतं जाणून घेतली. कार्यकर्ते, जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकल्या. त्यानंतर निर्णय घेण्यात आला.
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाला, त्यात आम्हाला यश मिळालं नाही. चांगलं काम करणारे कार्यकर्ते पराभूत झाले. आम्ही सामान्य माणसाच्या कामासाठी बसलो आहे. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार.
- एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्याशी फोन वरून बोलणे करुन दिलं आहे.
- वाईट वृत्तीला राजकारणातून बाहेर काढण्यासाठी आम्ही कायम संघर्ष करणार. सत्तेत त्यांच्यासोबत आलो म्हणून आम्ही शांत राहू असे वाटत असेल तर तसंही नाही.