ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv Politics: महापालिका निवडणुकानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका बसला आहे. तानाजी सावंत यांच्याविरोधात पुतण्या धनंजय सावंत यांनी मोठे बंड केले आहे. या निवडणुकीत धनंजय सावंत यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे.
तानाजी सावंत यांच्या कुटुंबामध्ये फूट
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारून परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागेवर आपल्या समर्थकासह आज बुधवारी दुपारी १:४५ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.
KDMC Election: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, सत्तेची समीकरणे काय?
धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याने परंडा तालुका शिवसेनेला खिंडार पडले असून, आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचला आहे. तर राज्याच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्याच्या वादाचा नवा अंक सुरू होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याआधी आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरु केल्याने चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता सावंत कुटुंबामध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले आहे.
भाजप- शिवसेना एकत्र लढणार
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धाराशिव मध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढत आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव मध्ये युती झाल्याची माहिती संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी दिली. जिल्हा परिषद ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा लढवत असून 51 पंचायत समितीचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. लोहाऱ्यात लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साळवींनी माहिती दिली.
Mira Bhayandar News: "मराठीच महापौर" हवा, अन्यथा रक्त सांडेल; मीरा भाईंदरमध्ये वाट पेटणार?