मनोज सातवी, मीरा- भाईंदर:
Mira Bhayander Mayor Controversy: महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता मुंबई सोबतच मीरा-भाईंदर महापालिकेत "मराठीच महापौर" हवा या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी “मराठी महापौर नाही तर मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माझे रक्त सांडेल, गोळ्या झेलायला मी तयार आहे!” असं म्हणत उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर मनसेने देखील मीरा-भाईंदर मध्ये मराठीच महापौर असावा यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता मीरा-भाईंदर मधे 'अ मराठी' महापौर बनला तर पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
KDMC Election: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, सत्तेची समीकरणे काय?
मीरा भाईंदरमध्ये मराठी- अमराठी वाद पेटणार!
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर भारतीय समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मीरा भाईंदर येथे भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा-भाईंदर मध्ये 'उत्तर भारतीय महापौर' बसवूया असं आवाहन केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. मुंबईत देखील मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं होतं. त्यावेळी आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याची सर्वसाधारण करत कृपाशंकर सिंह यांनी अखेर युटर्न घेतला होता. मात्र आता महापालिका निवडणुकीचा निकाल येऊन महापौर कोण बसणार यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी “मराठी महापौर नाही तर मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माझे रक्त सांडेल, गोळ्या झेलायला मी तयार आहे!” असे म्हणत, यासाठी "मराठी माणसाचे उग्र आंदोलन केले जाईल, संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा मिरा भाईंदरमधे पाहायला मिळेल" असा इशारा गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे. शिवाय मराठीत महापौर हवा यासाठी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठवले आहे.
Mumbai Mayor News: ठाकरेंच्या या 2 नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर; काय आहे कारण?
मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा
दरम्यान, मराठी एकीकरण समितीच्या मागणीला पाठिंबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष संदीप राणे यांनीही मीरा-भाईंदर महानगरपालिकेत मराठी महापौर बसवण्याच्या मागणीवर ठाम असून, गोवर्धन देशमुख यांच्या मराठी महापौर बसला नाही तर, रक्त सांडेल या वक्तव्यावर अविनाश जाधव यांनी "ते रक्त मराठी माणसाचं नसलं पाहिजे" असे म्हणत मनसे स्टाईलने इशारा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world