Dharashiv Election: 'अर्चना पाटील यांच्या विजयासाठी ओमराजेंचं प्लॅनिंग', धाराशिवमध्ये राजकारण रंगलं!

भाजपच्या अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांचे प्लॅनिंग आहे का ?  तशी लोकांमध्ये कुजबुज असल्याचा दावा सक्षणा सलगर यांनी केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव:

Dharashiv ZP ELection 2026: धाराशिवमध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरुद्ध ओमराजे निंबाळकर असा सामना रंगत असतानाच सक्षणा सलगर यांनी केलेल्या आरोपाने वाद वाढला आहे.  भाजपच्या अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांचे प्लॅनिंग आहे का ?  तशी लोकांमध्ये कुजबुज असल्याचा दावा सक्षणा सलगर यांनी केला आहे. 

अर्चना पाटलांच्या विजयासाठी ओमराजेंचं प्लॅनिंग..? 

भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचे ओमराजे निंबाळकर यांचे प्लॅनिंग आहे का अशी लोकात कुजबुज असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी केला आहे. तेर जिल्हा परिषद गटाच्या लढतीवरून सक्षणा सलगर यांनी काही प्रश्न उपस्थित करत ओमराजेंवर निशाणा साधला आहे. 

Mumbai Pune Expressway: तब्बल 33 तासानंतर मोकळा श्वास! मुंबई- पुणे एक्सप्रेसवेची मोठी अपडेट; सद्यस्थिती काय?

तेरमध्ये महाविकास आघाडी व्हावी ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती मग ओमराजे निंबाळकर यांनी त्याला केराची टोपली का दाखवली? त्यांना नेमकं कोणाला निवडून आणायचे विरोध फक्त दाखवण्यासाठी आहे का? असा सवाल करत सक्षणा सलगर यांनी निशाणा साधला. तर जिल्हा परिषद निवडणूक न लढण्याची घोषणा करून अर्चना पाटील पुन्हा मैदानात का? राणा जगजितसिंह पाटील आणि अर्चना पाटलांनी पक्ष खुंटीला बांधला अशी टीका सलगर यांनी केली.

धाराशिवमध्ये हायहोल्टेज लढत..!

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढत होत आहे. इथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असा तिरंगी सामना आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील भाजपकडून तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक आखाड्यात आहेत. तर राष्ट्रवादीकडून सक्षणा सलगर उमेदवार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहे. 

Advertisement

Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!