जाहिरात

Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!

Ajit Pawar Viral Video: 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्यातील या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी आपल्या बायोपिकबद्दल आणि त्यांच्यावर होणाऱ्या नकलांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले होते.

Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!

Ajit Pawar Viral Video:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघा महाराष्ट्र हळहळत आहेत. त्यांच्या स्वभावातील मिश्किल आणि दिलखुलास पैलू उलगडणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्यातील या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी आपल्या बायोपिकबद्दल आणि त्यांच्यावर होणाऱ्या नकलांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले होते.

बायोपिक आला तर अभिनेता कोण?

कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी अजितदादांना एक रंजक प्रश्न विचारला . "जर 'द अजित पवार' नावाचा बायोपिक आला, तर तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारावी?" यावर अजित दादांनी क्षणाचाही विलंब न लावता जवळच उभ्या असलेल्या डॉ. निलेश साबळे यांच्याकडे बोट दाखवत, "डॉक्टरनेच करावी असं मला वाटतं," असे उत्तर दिले. दादांचे हे उत्तर ऐकून निलेश साबळेही अवाक झाले होते.

(नक्की वाचा-  Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

निलेश साबळे यांच्या नकला आणि दादांची सुधारणा

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' मध्ये अजितदादांची हुबेहूब नक्कल करायचे. यावर बोलताना अजित पवारांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. निलेश नक्कल करताना वारंवार "या ठिकाणी, या ठिकाणी" असा उल्लेख करायचे. यावर अजित पवार यांनी म्हटलं की, "निलेशच्या नकलांमधून मला कळलं की मी हा शब्द जास्त वापरतोय. तेव्हापासून मी ठरवलं की हा शब्द कमीत कमी वेळा वापरायचा. तुम्ही बघा, त्यानंतरच्या काळात हा शब्द मी कमी केला आहे."

(नक्की वाचा-  Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)

"डॉक्टर, तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला, त्यातून मलाही कळेल माझं काय योग्य आहे आणि काय अयोग्य. मला स्वतःमध्ये दुरुस्ती करता येईल," असे म्हणत अजित पवारांनी निलेश साबळेंचेही कौतुक केले होते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com