Google Map पाहण्याच्या नादात कार नदीपात्रात पडली, धुळे शहरातील धक्कादायक घटना

Dhule Car Accident : कार चालक गूगल मॅप (Google Map) पाहण्यात गुंग असताना हा अपघात झाला.

जाहिरात
Read Time: 1 min
धुळे शहरातील कार अपघाताची सर्वत्र चर्चा आहे.
धुळे:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Dhule Car Accident :धुळे शहरातील कालिका माता मंदिरजवळ असलेल्या फरशी पुलाजवळ आज दुपारी (शनिवार, 31 मे 2025)  एक क्रेटा कारचा अपघात झाला. ही कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट पांझरा नदीपात्रात जाऊन पडली.  या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला. चालक गूगल मॅप (Google Map) पाहण्यात गुंग असल्यानं हा अपघात झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

धुळे शहरातील पांझरा नदीवर असलेल्या फरशी पुलावरून कार नदीत पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  कार चालक कार चालवताना मोबाईलवर मित्राने पाठवलेल्या गुगल मॅप पाहत होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

( नक्की वाचा : Akola Crime : काका- पुतण्यामध्ये झाला दारुमुळे वाद, त्यानंतर भयंकर घडलं! अकोला हादरलं )
 

काशीनाथ धुळगांडे असं या कारचालकाचं नाव आहे. तो मुळचा परभणीचा आहे. काशीनाथ त्याच्या मित्राला भेटण्यासाठी धुळ्यात आला होता.  त्याच्या मित्राने त्याला गूगल मॅप वर ऍड्रेस पाठवला होता. तो गूगल मॅप पाहत असताना काशीनाथचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला लागलीच जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

Topics mentioned in this article