
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
दारुच्या वादामधून काकांनी पुतण्याचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना अकोला शहरात घडली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे 30 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो जास्तच प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. त्यानंतर झालेल्या वादातून काका सुनील कमालकरनं कुणालचा काटा काढला अशी माहिती पोलिसांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी खदान पोलिसांनी त्याचा काका किशोर कमलाकरला संशयित म्हणून ताब्यात घेतलं.
कुणालचा मृतदेह ह तब्बल तीन ते चार दिवस काकाच्या घरात पडून होता.. दरम्यान कुजलेल्या स्थितीत असलेल्या कुणालच्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात सुटल्यानंतर स्थानिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर गुरुवारी (29 मे) संध्याकाळी खदान पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळ पोलिसांनी गाठून पंचनामा केला होता. त्यावेळी अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वीच कुणाल कमलाकर याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहावरून समोर आलं होतं.
( नक्की वाचा : Panvel : मुलगा नाही, पैसे आण... सासरच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह विवाहितेचं टोकाचं पाऊल! )
कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवला. प्राथमिक तपासणीमध्ये जबर दगडाने किंवा हत्याराने वार करून त्याचा मृत्यू झाला, हे निष्पन्न झालं. दरम्यान, मृत कुणाल आणि त्याचा 55 वर्षांचा काका हे दोघेही सोबतच दारू प्राशन करत होते. तसेच कुणाल हा बेपत्ता असल्याबाबतची तक्रारी ही खदान पोलीस ठाण्यात चार दिवसापूर्वी करण्यात आली होती.
सुनील कमलाकरला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांच्या चौकशीमध्ये त्यानंच ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world