थरकाप उडवणारा अपघात CCTVमध्ये कैद, तिला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने गमावला जीव

Dhule Accident CCTV: ट्रकखाली चिरडला गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement
Read Time: 1 min

Dhule Accident CCTV: धुळे शहरातील देवपूर परिसरातील भीषण अपघात झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. समोरील दिशेने बाइकवरून येणाऱ्या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बाइकस्वाराचे नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला. यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रक खाली चिरडल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

(नक्की वाचा: धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी)

थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. अगदी काही सेकंदामध्ये होत्याचे नव्हते झाले. हा अपघात इतका भीषण होता की गाडीखाली चिरलेल्या तरुणाच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

(नक्की वाचा: 'या' शहरात दगडफेक गँगची दहशत, रात्री करतात वाहनांची तोडफोड)

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. दरम्यान या घटनेबाबत धुळे शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

(नक्की वाचा: सायन रुग्णालय परिसरात महिलेला कारने चिरडलं, कार चालक डॉक्टरला अटक)

VIDEO : ट्रकखाली चिरडला गेल्याने बाइकस्वाराचा जागीच मृत्यू