Shivsena Dispute: राज्यसभेवरुन मोठा कलह, आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर धरली? महिला नेत्याचा खळबळजनक दावा

मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही, अशी टीकाही शितल म्हात्रेंनी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image
AI Image

Aditya Thackeray Vs Sanjay Raut:  महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्यावरुन संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचबाबत शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर पकडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 

काय म्हणाल्या शितल म्हात्रे? 

विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर संधी मिळवण्यासाठी शितल म्हात्रे, निलम गोऱ्हे अकलेचे तारे तोडत आहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली होती. अंधारेंच्या या टिकेला उत्तर देताना शितल म्हात्रेंनी मोठे विधान केले आहे. "ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला,आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा? त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे," असा खळबळजनक दावा म्हात्रेंनी केला आहे. ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या, मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही, अशी टीकाही शितल म्हात्रेंनी केली आहे.

Advertisement

construction Rule: मुंबई- पुण्यातील बांधकामे धोक्यात? मेट्रोला भगदाड पडल्यानंतर कडक नियम, प्रशासनाचा निर्णय

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे? 

"एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते,"

"विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोरे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शितल म्हात्रे.... म्हात्रे काय गोरे काय... यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत, दोघींनाही प्रेमळ सल्ला, आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका..!" असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला होता. 

Ashok Kharat News: अशोक खरातचे VIDEO व्हायरल करत असाल तर सावधान! पोलिसांकडून दोघांना अटक