Mumbai APMC Market News: तुम्हीही दिवाळीनिमित्त मिठाई खरेदी करण्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई APMC मसाला मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट्सचा पुरवठा होत असताना, या मागणीचा फायदा घेत काही भेसळखोरांनी बाजारपेठेत मोठा गोरखधंदा सुरू केल्याचे उघड झाले आहे.
भेसळयुक्त ड्रायफ्रुट्स
या मार्केटमधील G ,H,L विंग मधील गळ्यावर अनधिकृतपणे बदाम आणि ड्रायफ्युट्स मध्ये भेसळ करून आत आणि बाहेर विक्री केला जातोय .प्रत्यक्ष दृश्यांचे व्हिडिओ आता समोर आले असून, त्यातून भेसळीचे थरारक चित्र दिसत आहे. या व्हिडिओंमध्ये खिसमिसला रासायनिक द्रावणाने धुतले जात असल्याचे, त्यावर रंग आणि पावडर टाकून “चमकदार” बनविण्याची प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट दिसते. हीच वस्तू पुढे प्रोसेसिंग करून फ्लेवर मध्ये निघतात आणि आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात विक्रीसाठी ठेवली जाते.
नक्की वाचा: सिडकोकडून सर्वसामान्यांची लुट? घरांच्या किंमतीबाबत माहिती अधिकारात धक्कादायक बाब समोर
या व्हिडिओंमध्ये काजू आणि बदामाचे प्रोसेसिंगही अशाच प्रकारे होत असल्याचे दिसून येते. ट्रेमध्ये टाकून फ्लेवर साठी भट्टीमध्ये ठेवली जाते, तर बदाम सुद्धा कसे प्रकार प्रोसेसिंग केले जातात. जमिनीवर उघड्यावर साठवलेले दिसतात. या प्रक्रियेमध्ये स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा तसूभरही विचार न करता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ चालला असल्याचे स्पष्ट होत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भेसळ कारभारामागे बाजार समितीचे सभापती, संचालक,सचिव आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्या “आशीर्वादाने”च हा व्यवसाय फोफावला आहे. अधिकाऱ्यांना “लक्ष्मी दर्शन” झाल्यामुळे जाणूनबुजून कारवाई टाळली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
Jalna News: महापालिका आयुक्त रंगेहाथ ACB च्या जाळ्यात, लाचेची रक्कम ऐकून घाम फुटेल
सध्या ड्रायफ्रुट्सचे दर ५०० ते २२०० रुपये किलोपर्यंत असून, फ्लेवर आणि पॅक केलेले ड्रायफ्रुट्स त्याहून महाग विकले जात आहेत. परंतु या आकर्षक पॅकिंगच्या आड नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू आहे. दिवाळीच्या खरेदीत मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्सला पसंती देणाऱ्या ग्राहकांना यामागील वास्तव माहिती नसल्यामुळे, आता “भेसळखोरांची दिवाळी” सुरू झाली आहे.