Supriya Sule : सुप्रिया सुळेंना डॉक्टरांनी दिला Voice Rest चा सल्ला; घशाला संसर्ग का होतो?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डॉक्टरांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी दोन आठवड्यांपर्यंत व्हॉइस रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डॉक्टरांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी दोन आठवड्यांपर्यंत व्हॉइस रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यानंतर ते काही काळ मीडियापासून दूर असतील आणि यासह रॅलीतही सामील होणार नाही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, घशात असं काय घडतं की, ज्यामुळे डॉक्टर बोलण्यास मनाई करतात. 

सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मी नुकतच माझ्या घसा आणि आवाजाबाबत डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशाला सूज आल्याचं सांगितलं आणि आवाजाला आराम देण्याचा सल्ला देला. सुळे पुढे असंही म्हणाल्या, आवाजाची थेरेपी करावी लागेल आणि त्यांना पुढील एक ते दोन आठवड्यापर्यंत भाषण करण्यास आणि बोलण्यास मनाई केली आहे. 

Advertisement

गळ्यात इन्फेशन का होतं? 

जेव्हा घशात कोणताही व्हायरस, बॅक्टेरिया किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे सूज येते त्यावेळी घशाला इन्फेक्शन झाल्याचं म्हटलं जातं. अनेकदा फक्त घशाला वेदना होतात, अनेकदा आवाज नीट फुटत नाही आणि बोलताना त्रास होतो. जर संसर्ग स्वरयंत्रापर्यंत पोहोचला, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला काही दिवसांसाठी कमी बोलण्याचा किंवा अजिबात न बोलण्याचा सल्ला देऊ शकतात. यामुळे स्वरयंत्राला विश्रांती मिळते, ज्यामुळे लवकर आराम मिळतो. जर संसर्ग स्वरयंत्रापर्यंत पोहोचला, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला काही दिवसांसाठी कमी बोलण्याचा किंवा अजिबात न बोलण्याचा सल्ला देऊ शकतात. यामुळे स्वरयंत्राला विश्रांती मिळते, ज्यामुळे लवकर आराम मिळतो.

घशाचे संक्रमण का होते?

घशाच्या संक्रमणाची अनेक कारणे आहेत -

विषाणूजन्य संक्रमण (सर्दी किंवा फ्लू)
जिवाणूजन्य संक्रमण (जसे की स्ट्रेप थ्रोट)
दीर्घकाळ बोलणे किंवा मोठ्याने बोलणे
धूळ, धूर किंवा प्रदूषण
धूम्रपान
ॲसिड रिफ्लक्स (पोटातील आम्ल घशात येणे)
हवामानातील बदल, विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात


घशाच्या संक्रमणाची लक्षणे कोणती आहेत?

  • घशात दुखणे किंवा जळजळ होणे
  • गिळण्यास त्रास होणे
  • घसा बसणे किंवा आवाज घोगरा होणे
  • खोकला
  • ताप
  • घशात सूज येणे
  • मानेतील ग्रंथींना सूज येणे
  • यावर उपचार कसे केले जातात?

घशाच्या संक्रमणावरील उपचार हे संक्रमण विषाणूमुळे झाले आहे की जिवाणूमुळे, यावर अवलंबून असते.

व्हायरल इन्फेक्शन झाल्यास कोमट पाण्याच्या गुळण्या घ्या. औषधांचं सेवन केल्यास आराम मिळू शकतो. 

घशाच्या संसर्गाच्या बाबतीत, गरज भासल्यास डॉक्टर अनेकदा अँटिबायोटिक्स लिहून देतात.

जर संसर्ग किंवा जिवाणूंमुळे आवाजावर लक्षणीय परिणाम झाला असेल, तर डॉक्टर आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला देऊ शकतात, म्हणजेच शक्य तितके कमी बोलण्याचा सल्ला दिला जातो.

कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे आणि शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याचा सल्लाही दिला जातो.

आवाजाला विश्रांती का आवश्यक आहे?
 

डॉक्टर आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला देतात. कारण जास्त बोलल्यामुळे आधीच सुजलेल्या स्वरतंतूंवर दाब येतो. यामुळे सूज वाढू शकते आणि घसा बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो. म्हणूनच, स्वरतंतूंना विश्रांती मिळावी यासाठी डॉक्टर काही दिवस कमी बोलण्याचा किंवा अजिबात न बोलण्याचा सल्ला देतात.

Advertisement


 


Topics mentioned in this article