Dombivli Crime: संतापजनक! परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी तरुणाला बेदम मारहाण; डोंबिवलीतील घटना

विष्णूनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dombivli Crime:  मुंबईमध्ये मराठी- हिंदी वादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वीच अंधेरीमध्ये एका टीसीने मराठीवरुन हुज्जत घालत प्रवाशाला बंदिस्त केल्याचा प्रकार घडला होता. अशातच आता डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील सरोवरनगर परिसरात एका मराठी व्यक्तीला एका परप्रांतीय कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Jejuri Warkari Accident: माऊलींच्या पालखीत आक्रोश! वृद्ध ड्रायव्हर, तापाच्या गोळीने केला घात; कसा घडला अपघात?

डोंबिवलीत मराठी व्यक्तीला परप्रांतियांची मारहाण 

डोंबिवली पश्चिम येथील सरोवरनगर परिसरात कुबेर अंगण सोसायटीमध्ये राहणारे विशाल पाटील यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तिघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. विशाल पाटील यांच्या घरासमोर सांडपाणी साचत असल्याने त्यांनी समोरील सोसायटीत राहणारे ओंकारनाथ तिवारी यांना याबाबत जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

Advertisement

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप असून, ओंकारनाथ तिवारी, त्यांचा मुलगा सत्यम तिवारी आणि जय शुक्ला यांनी विशाल पाटील यांना बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Warkari Accident: भीषण अपघात! अनियंत्रित ट्रक माऊलींच्या दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू