जाहिरात

Jejuri Warkari Accident: माऊलींच्या पालखीत आक्रोश! वृद्ध ड्रायव्हर, तापाच्या गोळीने केला घात; कसा घडला अपघात?

दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक आजारी असल्याने त्याचं नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली. 

Jejuri Warkari Accident: माऊलींच्या पालखीत आक्रोश! वृद्ध ड्रायव्हर, तापाच्या गोळीने केला घात; कसा घडला अपघात?

देवा राखुंडे, बातमी:

Jejuri Warkari Accidenyt News:  सासवड जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाका परिसरात आज झालेल्या टेम्पो अपघात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सासवड-जेजुरी रस्त्यावर, बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा गंभीर अपघात घडला. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक आजारी असल्याने त्याचं नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली. 

Warkari Accident: भीषण अपघात! अनियंत्रित ट्रक माऊलींच्या दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू

कस घडला अपघात? 

सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडी होती. या दिंडीत सांगली जिल्ह्यातील अनेक वारकरी होते. त्यांच्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीचा एक ट्रक चालला होता. याच ट्रकने महिला वारकऱ्यांना चिरडले. ट्रकचा चालक हा ७० वर्षीय असून तो दोन दिवसांपासून सर्दी, तापाने त्रस्त होता. यासाठी त्याने गोळी घेतली होती. गोळी घेतल्यामुळे त्याला गुंगी आली वाहनावरील नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली जखमींची भेट 

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.  सासवड–जेजुरी मार्गावर  झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

Kolhapur News: बाळाच्या बारशाची लगबग; नवरा, सासू-सासरे हॉल पाहायले गेले; आईने संपवलं आयुष्य

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com