Dombivli Politics: डोंबिवलीत आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्यात मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. मी मर्सिडीजमध्ये फिरणारा माणूस आहे, टेंडरच्या पैशातून संपत्ती जमा करून माज दाखवणारा मी नाही, अशा शब्दात राजू पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
Nashik News: नाशिक हादरले! पीजीत राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपी तरुणाचेही टोकाचे पाऊल
काय म्हणाले राजू पाटील?
मेळाव्यात बोलताना पाटील म्हणाले, "रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत, ते वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. मग डोंबिवलीच्या विकासासाठी त्यांनी नेमके काय केले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मात्र, माझ्यावर टीका करण्यासाठी काही लोक सोशल मीडियावर ट्रोलिंग करत आहेत." कोविड काळात आपण स्वतःचे हॉस्पिटल मदतीसाठी उपलब्ध करून दिले होते, मात्र त्याबद्दलही 10 लाख भाडे घेतल्याचे चुकीचे आरोप लावले जातात. त्या काळात कुणीही कोणाच्या जवळ जात नव्हते, तेव्हा मी दानत दाखवली. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा," असे आव्हान त्यांनी दिले.
तसेच "तुमचा दादा रिक्षा चालवायचा तेव्हा मी मर्सिडीजमध्ये फिरायचो, खानदानी आहे. टेंडरच्या पैशातून गाड्या घोडे घेऊन कोणी माज दाखवत असेल तर मी ऐकून घेणार नाही, कारण मी त्यातला नाही. सगळ्यांना विनंती आहे की यांच्या मागे लागू नका. मी सक्षम आहे माझ्या बाजूलाच आहेत ते तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. विकासकामांवर चर्चा करायची असेल तर स्वागत आहे, मात्र खालच्या पातळीवरचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. असा इशाराही राजू पाटील यांनी यावेळी दिला.
Sangli Politics: खासदार विशाल पाटलांना धक्का! कष्टाने आणलेली सत्ता गेली; सांगलीच्या राजकारणात खळबळ
नगरसेवक दिपक म्हात्रेंवरही निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना राजू पाटील यांनी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावरही निशाणा साधला. "मी बोलण्याच्या ओघात 'तो रवी कुठे' असे म्हटले. मात्र, त्याचा वेगळाच अर्थ काढून बाजार मांडण्यात आला. माझा आक्षेप बॅज लावून जाण्याबाबत होता. दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुकू नको अरे तू थुकून थुकून थोबडा ओला केला आहे. दीपेश म्हात्रे यांनी तो बॅज लावूनच जावे, म्हणजे ते कोणत्या पक्षात आहेत हे सर्वांना समजेल, असा टोला त्यांनी लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world