काय सांगता? Dominos मधील कामगाराला आली 15 कोटींची आयकर नोटीस! वाचा काय आहे प्रकरण

Chandrapur News : डॉमिनोजमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य तरुणाला चक्क 15 कोटी 48 लाख रुपयांची आयकर नोटीस आल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chandrapur News : डॉमिनोजमधील कामगाराला आयकर विभागाची मोठी नोटीस आली आहे.
चंद्रपूर:

अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी 

Chandrapur News : डॉमिनोजमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य तरुणाला चक्क 15 कोटी 48 लाख रुपयांची आयकर नोटीस आल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे चंद्रपुरात खळबळ उडालीय. दिवाकर कुकुडकर असे या तरुणाचे नाव आहे. तो  चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात धाबा गावचा रहिवाशी आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण? 

दिवाकरचे पाच वर्षांपूर्वी शैक्षणिक दस्तावेज हरवले होते. त्याची त्यानं पोलिसांमध्ये तक्रारही केली. त्यानंतर तो गुजरातमधील भावनगरमध्ये कामाच्या शोधात गेला. तिथे त्याला  KFC, PIZZA HUT या शोरुममध्ये काम मिळाले.

दिवाकर मागच्या वर्षी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात आला. डॉमिनोजच्या एका शॉपमध्ये तो काम करू लागला. सगळे सुरळीत असताना मागील मार्च महिन्यात त्याला आयकर विभागाची नोटीस मिळाली. प्रारंभी त्याला सुचलेच नाही. पण जाणकारांकडून माहिती घेतली, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने आयकर विभागात जाऊन वास्तविकता सांगितली. पण सकारात्मक उत्तर मिळाले नाही. 

( नक्की वाचा : भयंकर! रुग्णवाहिका कुत्र्याला धडकली, संतापलेल्या मालकानं पेशंटचा जीव घेतला! )
 

नावावर ट्रेंडिंग कंपनी 

दिवाकरच्या  नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली आहे. त्याची GST नोंदणी पण करण्यात आल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे चक्रावून गेलेल्या दिवाकरने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर आता काय निर्णय होतो, आयकर विभाग काय भूमिका घेते आणि खरेच दिवाकर निरागस आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे बाकी आहेत. पण आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरचे श्रम, पैसे आणि वेळ वाया जात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article