'देशातल्या पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अमरावतीच्या भूमिपुत्राला मान'

देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या हंगामी कुलगुरुपदाचा मान अमरावतीच्या भूमिपुत्राला मिळाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
अमरावती:

शुभम बायस्कार, अमरावती 

देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या हंगामी कुलगुरुपदाचा मान अमरावतीच्या भूमिपुत्राला मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या निर्मितीचे काम गतीने सुरू आहे.याच मराठी विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मूळचे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील काठी येथील डॉ.अविनाश आवलगावकर यांची  निवड केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी विद्यापीठाची मागणी करण्यात येत होती. अनेक भाषांची विद्यापीठ भारतामध्ये निर्माण झाली आहेत. तेलगू, तामिळ, हिंदी, संस्कृत, कन्नड इत्यादी भाषांचा समावेश यात करता येईल. पणं, मराठी भाषेचे विद्यापीठ नव्हतं. मराठी भाषेच साहित्य ज्या पवित्र भूमीत निर्मित झालं. त्याठिकाणी हे विद्यापीठ आकारला येत आहे, त्याचा विशेष आनंद आहे, अशी भावना आवलगावकर यांनी  'NDTV मराठी' शी बोलताना केली. 

कोण आहेत डॉ.अविनाश आवलगावकर?

डॉ.अविनाश आवलगावकर हे मूळचे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील राजुराबाजार पासून दोन किलोमीटरवर असलेल्या काठी या छोट्याशा गावचे आहेत. त्यांचे वडील हे अमरावती जिल्ह्यातच शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते 1995 पासून पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अहमदनगरच्या एका महाविद्यालयात देखील कार्यरत होते.

( नक्की वाचा : नितीन गडकरींच्या वाहनाचे स्टेअरिंग भाजपाच्या जुन्या नेत्याच्या हाती, विदर्भात चर्चांना उधाण )
 

'संशोधन महर्षी' उपाधीने सन्मानित

महानुभाव साहित्यावर डॉ.अविनाश आवलगावकर यांचा विशेष अभ्यास आहे, गेल्या वर्षी त्यांना नागपूरच्या विदर्भ संशोधन मंडळाने 'संशोधन महर्षी' या उपाधीने सन्मानित करण्यात आल होतं. महानुभाव साहित्य, संत साहित्य आणि आधुनिक साहित्यात त्यांचे विशेष योगदान आहे. 

Advertisement

मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीला चालना देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली. भाषा हे केवळ संपर्क साधन नसून तिला एक सांस्कृतिक मूल्य आहे. ते मूल्य समाजामध्ये रुजवण्यासाठी या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप काही प्रयत्न करता येतील, असेही डॉ. आवलगावकर यांनी सांगितले.
 

Topics mentioned in this article