Eid E Milad 2025 Holiday : ईद-ए-मिलाद-उन-नबी किंवा ईद मिलादुन्नबी हा दिवस पैगंबर हजरत मुहम्मद साहब यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. हा जगभरातील मुस्लिमांसाठी एक अतिशय खास सण आहे. यंदा ५ सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद साजरा केला जाणार आहे.
ईद-ए-मिलाद रोजी बँका बंद राहतील? l banks remain closed on Eid-e-Milad?
यंदा ५ सप्टेंबर रोजी, ईद-ए-मिलाद-उन-नबी किंवा मिलाद-ए-शरीफ किंवा बारा वफत हा मुस्लिम समुदायासाठी एक अतिशय खास दिवस आहे. हा दिवस पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी मशिदी आणि घरे सजवली जातात. कुराण शरीफचे पठण केले जाते आणि लोक गरजूंना मदत करतात. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये बँका बंद राहतील.
मुंबई आणि उपनगरात 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला असेल सार्वजनिक सुट्टी
राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांपैकी ईद-ए-मिलादची सुट्टी 5 सप्टेंबर 2025 रोजी आहे. मात्र 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. 21 ऑगस्ट 2025 रोजी विविध मुस्लीम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लीम समुदायाने सोमवार, 8 सप्टेंबर रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025 ऐवजी, सोमवार 8 सप्टेंबर 2025 हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025 ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकारने पत्रक प्रसिद्ध केलं आहे. काही शाळांना 5 सप्टेंबरलाही सुट्टी दिल्याची माहिती आहे.
काय आहे शासन निर्णय..
ईद-ए-मिलाद निमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.
शनिवार ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू - मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरू राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
स्टॉक मार्केटचं काय? l Stock Markets Open Or Closed
ईद-ए-मिलादला शेअर मार्केटही बंद राहणार नाही. शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी आणि सोमवारी 8 सप्टेंबरलाही स्टॉक मार्केट बंद राहणार नाही तर खुलं असेल.