Eknath Khadse : जावयानंतर माझ्यावरही पाळत का ठेवली? खडसेंच्या घराबाहेर साध्या वेशातील पोलीस, रोहिणी खडसेंनी व्हिडिओ केला शूट

सहा जण मिळून घरात बसत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणायचा का? असा सवाल एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Eknath Khadse : पुण्यात 26 जुलैच्या रात्री छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती असा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. या पार्टीमध्ये दारू, गांजासह कोकेन आढळल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी आज (२९ जुलै) पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला. 

सहा जण मिळून घरात बसत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणायचा का? 'रेव्ह पार्टीवर छापा', 'खडसेंच्या जावयाला अटक' अशी बातमी समोर आली. सात जणं मिळून जिथं संगीत-डान्स नाही. एकत्र बसून पार्टी करतात याला रेव्ह पार्टी म्हणता येत असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पाच-सहा जण बसले तर त्याला रेव्ह पार्टी म्हणावं लागेल, अशा शब्दात एकनाथ खडसेंनी संताप व्यक्त केला. 

Advertisement

एकनाथ खडसेंवरही पाळत..

पत्रकार परिषदेत खडसे म्हणाले की, माझ्यावरही पाळत ठेवली जात आहे. माझ्या घराजवळ सहा ते सात साध्या वेशातील पोलीस माझ्यावर पाळत ठेवत आहेत. पत्रकार परिषदेच्या परिसरातही साध्या वेशातील पोलीस आढळून आल्याचं खडसेंनी सांगितलं. यावर त्यांनी सरकारला सवाल विचारले आहेत. माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलं आहे. खडसेंच्या घराबाहेर पाच ते सहा पोलीस साध्या वेशात आढळून आले होते. याचा व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी शूट केला आहे. त्यानंतर खडसेंनी पत्रकार परिषदेत हा व्हिडिओही दाखविला. 

Advertisement

कारवाईचे व्हिडिओ बाहेर कसे आले?  

एकनाथ खडसे म्हणाले, पोलिसांनी जिथं कारवाई केली त्याचे व्हिज्युअर्स बाहेर कसे आले? बदनामी करण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारचं कृत्य केलं  आहे. महिलांचेही चेहरे दाखविण्यात आले. या प्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्याचे कारण काय? त्यांच्यावर एकही गुन्हा नाही., वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. अमली पदार्थांचा साठा महिलेच्या पर्समध्ये सापडला. तिलाही माहीत नाही असं ती म्हणते. तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला हवं होतं. यांना साक्षीदार करणं अपेक्षित होतं. मात्र असं न करा एकनाथ खडसेंच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खेवलकरांवर आरोप केले जात आहे. प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासोबतच्या एक व्यक्तीने अल्कोहोल घेतल्याचं रिपोर्टमध्ये आलं आहे. मात्र ड्रगचा रिपोर्ट का नाही आला? ड्रग्सच्या रिपोर्टबाबत छेडखानी करण्याचा संशय खडसेंनी व्यक्त केला. 

Advertisement

साध्या वेशात पोलिसांकडून पाळत..

खेवलकरांनी सांगितल्याुसार, त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. ते जिथं जिथं जात होतो, साध्या वेशातील पोलीस पाळत ठेवत होते. याचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. साध्या वेशातील पोलीस वेस्ट इन हॉटेलमधील वाहनतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याचं खडसेंनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवली.  मात्र राज्यभरातील गंभीर प्रकरणात सरकार पावलं का उचलत नाही. पोलीस यंत्रणेकडून खडसेंच्या बदनामीचा प्लान करीत आहे. पोलिसांनी, सरकारने याची उत्तरं द्यायला हवीत.  

Topics mentioned in this article