Pune News: 7 महिन्यांनी पुन्हा EVM उघडणार! 2 मतदारसंघात होणार पडताळणी! काय आहे कारण?

विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 7 महिन्यांनी पुणे जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात  25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी व पडताळणीचे कामकाज करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
पुणे:

राज्यातील विधानसभा निवडणुका होऊन आता 7 महिने उलटले आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतासह सत्तेमध्ये आलं. या निवडणुकीनंतर EVM च्या विश्वासर्हतेचा वाद चांगलाच गाजला होता. आता निवडणुकीनंतर तब्बल 7 महिन्यांनी पुणे जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात  25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी व पडताळणीचे कामकाज करण्यात येणार आहे.

काय आहे कारण?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर 7 दिवसांच्या आत ईव्हीएम मशीन्सची, बर्न्ट मेमरी / कंट्रोलरची तपासणी व पडताळणी करीता उमेदवारांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्याची तरतुद आहे.पुणे जिल्हयातील  21  विधानसभा मतदार संघांपैकी  11 विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी या कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते. 

त्यापैकी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित  6 उमेदवारांपैकी 4  मतदार संघांमध्ये निवडणूक याचिका दाखल आहे. उर्वरित 2 उमेदवारांच्या अर्जानुसार 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये सदर ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी आणि पडताळणीचे कामकाज करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे. 

( नक्की वाचा : Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी का दिला राजीनामा? 10 तासांमध्ये काय घडलं? वाचा Inside Story )

Advertisement

तो दावा खोटा!

दरम्यान, 21 जुलै 2025 रोजी हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमाद्वारे  हडपसर  विधानसभा मतदार संघातील 27 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रामधील नोंदवलेल्या मतांची मतमोजणी होणार असल्याचा  तसेच त्याच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदान चिठ्ठयांची पुनश्च: मोजणी 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीत करण्यात येणार असल्याचा व्हिडीओ प्रसिध्द केला होता. 

त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, तपासणीवेळी  भारत निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार  संबंधित उमेदवारांनी या कार्यालयास कोणत्या ईव्हीएम मशीन्स तपासावयाच्या आहेत याची यादी दिलेली आहे, त्यानुसार त्या  क्रमांकाच्या ईव्हीएम मशीन्स सुरक्षा कक्षातून  काढून  उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर  कंट्रोल युनिट मधील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते पडलेली आहेत ते दाखवले जाणार आहे.

Advertisement

यावेळी विधानसभा निवडणूकीत उमेदवारांना मिळालेल्या  मतांच्या व्हीव्हीपॅट स्लीपस ची मोजणी होणार नाही. त्यामुळे प्रशांत जगताप यांनी प्रसिध्द केलेल्या व्हिडीओतील निवेदन हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांच्या तपासणी आणि पडताळणी संदर्भातील मानक प्रणालीनुसार नाही असे, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे मिनल कळसकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Topics mentioned in this article