माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरे हॉस्पिटलमध्ये दाखल

Ex MLA Sangita Thombre :  केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्य कारवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलीय.या दगडफेकीमध्ये ठोंबरे जखमी झाल्याची माहिती आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

Ex MLA Sangita Thombre :  केजच्या माजी भाजपा आमदार संगीता ठोंबरे यांच्य कारवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलीय.या दगडफेकीमध्ये ठोंबरे जखमी झाल्याची माहिती आहे.  वडमाऊली दहिफळ या गावात त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली यावेळी त्यांना अश्लील भाषेत शिवी गाळही केल्याची माहिती मिळाली आहे. संगीता ठोंबरे यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

संगीती ठोंबरे केज तालुक्यातील  वड माऊली येथील दहिफळ वडगाव येथे आल्या होत्या. या गावाहून परतत असताना त्यांच्या कारवर अज्ञाताकडून दगडफेक केली.यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर मोरे याला लागला. त्यानंतर तोच दगड कारमध्ये बसलेल्या संगीता ठोंबरे यांना लागला. 

ठोंबरे यांना उपजिल्हा रुग्णालय केज इथं दाखल करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान ही दगडफेक का करण्यात आली ? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

( नक्की वाचा : Puja Khedkar : 'मला अपात्र ठरवण्याचा UPSC ला अधिकार नाही,' पूजा खेडकरांचं कोर्टात उत्तर )

संगीता ठोंबरे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून विजयी झाल्या होत्या. गेल्या काही काळ त्या राजकारणापासून लुप्त होत्या मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून त्या मतदारसंघात दौरे करत आहेत त्यातच हा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वीच संगीता ठोंबरे यांनी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेटही घेतली होती.  

Advertisement
Topics mentioned in this article