जाहिरात

Explore Konkan App: पर्यटन प्रेमींसाठी पर्वणी! एका क्लिकवर 'एक्सप्लोर कोकण', काय आहे खास APP?

Explore Konkan App Information In Marathi: कोकणच्या निसर्गरम्य सौंदर्याची, समृद्ध संस्कृतीची आणि ऐतिहासिक वारशाची माहिती आता एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे.

Explore Konkan App: पर्यटन प्रेमींसाठी पर्वणी! एका क्लिकवर 'एक्सप्लोर कोकण', काय आहे खास APP?

राकेश गुडेकर, प्रतिनिधी:

Explore Konkan App: पर्यटन, खाद्यसंस्कृती अन् लोकपरंपरांचा समृद्ध वारसा असलेला भाग म्हणजे आपलं कोकण. कोकणात पर्यटनाला जाण्याची, कोकणातील संस्कृती, परंपरा जाणून  घेण्याची, कोकणातील मासे खाण्याची  प्रत्येकाची इच्छा असते. आता याच पर्यटन प्रेमींसाठी कोकणातील A टू Z माहिती देणारे ऍप तयार करण्यात आले आहे. 'एक्सप्लोर कोकण' असं या खास ॲपचे नाव आहे. गेली अनेक वर्षे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सतीश कदम यांच्याकडून एँपची निर्मिती करण्यात आली आहे. 

कोकणच्या निसर्गरम्य सौंदर्याची, समृद्ध संस्कृतीची आणि ऐतिहासिक वारशाची माहिती आता एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. गेली अनेक वर्षे पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. सतीश कदम यांनी पर्यटकांच्या सोयीसाठी 'एक्सप्लोर कोकण' (Explore Konkan) या ॲपची निर्मिती केली आहे. संपूर्ण कोकणची माहिती देणारं तसं हे पहिलंच ॲप आहे. या ॲपमुळे कोकण पर्यटन अधिक सोपे, सुलभ आणि माहितीपूर्ण होणार आहे.

Candela Boats In Mumbai: मुंबईच्या जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज, कशी आहे कॅन्डेला बोट?

ॲपमध्ये काय आहे?

'एक्सप्लोर कोकण' हे ॲप कोकणच्या समग्र माहितीचा खजिना आहे. पर्यटनासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यात खालील प्रमुख गोष्टींचा समावेश आहे:

  • पर्यटन स्थळे आणि समुद्र किनारे: कोकणातील समुद्र किनाऱ्यांची व नयनरम्य पर्यटन स्थळांची माहिती.
  • ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे: कोकणातील महत्त्वाचे गड-किल्ले, तसेच धार्मिक स्थळे आणि मंदिरे यांची सखोल माहिती.
  • नैसर्गिक सौंदर्य: मनमोहक धबधबे आणि इतर नैसर्गिक ठिकाणांची माहिती.
  • संस्कृती आणि परंपरा: कोकणातील महत्त्वाचे सण, यात्रा आणि स्थानिक खाद्य संस्कृतीची ओळख.
  • स्थानिक उत्पादने: कोकणी उत्पादने, हस्तकला आणि विशेष वस्तूंची माहिती.

ऍक्टिव्हिटी: पर्यटकांना करता येणाऱ्या विविध ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज (Adventure Activities) ची माहिती.

दोन भाषांचा पर्याय:

पर्यटकांची सोय लक्षात घेऊन या ॲपमध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील तसेच परदेशातील पर्यटकांनाही कोकणची माहिती सहजपणे मिळू शकेल. या ॲपचे निर्माते श्री. सतीश कदम हे पर्यटन क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कोकणच्या पर्यटनाला चालना मिळावी आणि पर्यटकांना अचूक माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने त्यांनी या ॲपची निर्मिती केली आहे.

 दरम्यान, त्यांचे हे पाऊल कोकणच्या पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या ॲपमुळे कोकणात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला 'वन क्लिक'वर (एका क्लिकवर) संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याने, पर्यटनाचा अनुभव अधिक नियोजनबद्ध आणि अविस्मरणीय होईल यात शंका नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com