Washim Crime News : तरुणीचे बनावट अश्लील फोटो व्हायरल, Ex बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखला

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी युवकाने तिचे आणि तिच्या एका मित्राचे मूळ छायाचित्र घेतले आणि त्यात छेडछाड करून अश्लील स्वरूप दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins

साजन ढाबे, वाशिम

Washim News : तरुणीनेच बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एका 32 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाशिमच्या रिसोड तालुक्यात ही घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी युवकाने तिचे आणि तिच्या एका मित्राचे मूळ छायाचित्र घेतले आणि त्यात छेडछाड करून अश्लील स्वरूप दिले. या छायाचित्रांचा वापर करून त्याने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले व त्यावरून फोटो व्हायरल केले.

(नक्की वाचा - Education City: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, 5 विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र)

आरोपी व पीडित युवती यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र आरोपीचे लग्न झाल्यानंतर पीडितेने संबंध पूर्णतः तोडले होते. यानंतर ती शिक्षणासाठी मराठवाड्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये दाखल झाली. कॉलेजमध्ये तिची दुसऱ्या तरुणाशी ओळख झाली. याचा राग मनात ठेवून आरोपीने तिची बदनामी करण्याचा डाव रचला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणी पीडितेने स्थानिक रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरोधात विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article