Akola News: “ओबीसी आरक्षणाला धक्का...”, WhatsApp स्टेटस ठेवत शेतकऱ्याची आत्महत्या

Akola News: विजय बोचरे हे मेहनती शेतकरी तर होतेच, पण त्याचबरोबर ते ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी नेहमी झटणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला

अकोला जिल्ह्यातील पातुरच्या आलेगाव येथील शेतकरी आणि ओबीसी समाजाचे खंदे कार्यकर्ते विजय बोचरे यांनी 9 ऑक्टोबर रोजी पहाटे आत्महत्या केली. गावातील बसस्थानकाजवळील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं. त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने आलेगावसह संपूर्ण पातूर तालुका हादरून गेला आहे.

आत्महत्येपूर्वीची वेदनादायक स्टेटस

आत्महत्येपूर्वी विजय बोचरे यांनी मोबाईलवर सलग तीन भावनिक स्टेटस पोस्ट केल्या. त्यात त्यांनी मुख्यमंत्री व ओबीसी नेत्यांना उद्देशून लिहिले की, “राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.आमच्या मुला–बाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे. शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे.आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही. जय ओबीसी, जय संविधान.”

(नक्की वाचा - OBC students: ओबीसी विद्यार्थ्यांची मोठी चिंता मिटली, आता प्रत्येक जिल्ह्यात मिळणार...)

याचबरोबर त्यांनी पुढे स्पष्ट आवाहन केलं की, “जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये." हे मेसेज त्यांनी पहाटे अडीचच्या सुमारास टाकले आणि काही वेळातच आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाचा तपास चान्नी पोलीस करत आहेत.

आयुष्यभर समाजासाठी झटलेले कार्यकर्ते

विजय बोचरे हे मेहनती शेतकरी तर होतेच, पण त्याचबरोबर ते ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी नेहमी झटणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे ते खंदे समर्थक होते. त्यांच्या समाजप्रेमामुळे व न्यायासाठीच्या लढ्यामुळे त्यांना गावात मानाचा दर्जा मिळाला होता.

Advertisement

(नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार)

समाजात हळहळ आणि संताप या घटनेमुळे व्यक्त होत आहे. दरम्यान बोचरे यांच्या आत्महत्येमुळे आलेगाव व पातूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. गावातील नागरिकांनी सांगितले की – “ते मेहनती शेतकरी, समाजासाठी सदैव तत्पर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते.” त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे गाव हादरून गेले असून ओबीसी समाजात संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पुढील प्रश्न आता निर्माण झालाय. ओबीसी समाजाच्या मागण्यांना पुन्हा एकदा धार आली आहे. 

Topics mentioned in this article