Competition for farmers : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक नव्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत आयोजित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. (Farmers' crop competition)
काय आहे नवा उपक्रम?
राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. रब्बी हंगामात अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेअंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये मिळणार आहेत. राज्य स्तरावर उत्पादनकर्त्या प्रथम येणाऱ्याला ही रक्कम देण्यात येणार आहे. या स्पर्शेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान एक एकर क्षेत्रावर सलग लागवड करणं आवश्यक आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नक्की वाचा - Vithabai Narayangaonkar : तमाशात नाचता नाचता मुलीला जन्म दिला; मोठ्या पडद्यावर लावणी सम्राज्ञी कोण साकारणार?
सहभागी होण्यासाठी काय आवश्यक?
सातबारा आणि आठ अ चा उतारा
जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)
७/१२ उताऱ्यावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
बँक खाते चेक पासबुकशी छायांकित प्रत
बक्षीसाची रक्कम -
राज्य पातळी
पहिले - ५० हजार
दुसरं - ४० हजार
तिसरं - ३० हजार
जिल्हा पातळी
पहिलं - १० हजार
दुसरं - ७ हजार
तिसरं - ४ हजार
तालुका पातळी
पहिलं - ४ हजार
दुसरं - ३ हजार
तिसरं - २ हजार