Mumbai GBS : टेन्शन वाढलं! मुंबईत जीबीएसचा पहिला मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा 7 वर  

जीबीएस आजाराची लक्षणं काय आहेत? नागरिकांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?

जाहिरात
Read Time: 1 min

Mumbai GBS : पुण्यात  (Pune GBS) गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे (Guillain Barre Syndrome)  आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 22 जणं व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आरोग्य विभागाकडूनही पाणी उकळून पिण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान मुंबईतून जीबीएसबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत जीबीएसच्या पहिल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जीबीएस आजाराने त्रस्त असलेली एक 53 वर्षीय रुग्णाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. हा रुग्ण वडाळ्यातील राहणारा असून व्ही.एन.देसाई रुग्णालयात वॉर्डबॉयचं काम करीत होता. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 23 जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या तपासणीत त्यांना जीबीएसची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागातही उपचार सुरू होते. 

नक्की वाचा - GBS नंतर पुणेकरांना आणखी एक टेन्शन! शहारात डुकरांच्या गूढ मृत्यूचं सत्र, करण काय?

आजाराची सर्वसाधारण लक्षणे

  • अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवा येणं.
  • अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे. 
  • डायरिया (जास्त दिवसांचा) 

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  1. पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून घेणे. 
  2. अन्न स्वच्छ आणि ताजे असावे. 
  3. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. 
  4. शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणं टाळावे. 
  5. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्यास जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा