लक्ष्मण सोळुंके, जालना
शेतकऱ्याचं अपहरण करून 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी कुटुंबासह संपून टाकण्याची धमकी देत 25 लाखांच्या खंडणी मागणी करत होते. जालन्यातील धानोरा तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी निवृत्ती तांगडे 22 मार्च रोजी धानोरा येथील त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर झोपले होते. त्यावेली 5 ते 7 अज्ञात चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबुन त्यांना त्यांच्या गाडीमध्ये टाकून जालना मंठा हायवे रोडने जालनाच्या दिशेने घेऊन गेले. आरोपींनी त्यांच्या खिशातील 15 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांना जीवे न मारता सोडून देण्यासाठी 25 लाख रुपयाची खंडणी मागितली.
(नक्की वाचा- Rain Forecast : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; या 10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट)
यावेळी घाबरलेल्या निवृत्ती तांगडे यांनी दरोडेखोरांना खंडणी म्हणुन 25 लाख रूपये देण्याचे मान्य केले. मात्र दरोडेखोरांनी तांगडे यांना घोडेगाव फाटा येथे रात्री आणून सोडून दिले. त्यानंतर 22 मार्च रोजी दुपारी दरोडेखोरांनी निवृत्ती तांगडे यांना फोनवर संपर्क करुन धमकावलं. खंडणी म्हणून 25 लाख रुपये दे अन्यथा तुझ्यासह तुझ्या कुटुंबालाही संपवून टाकू, अशी धमकी दिली.
(नक्की वाचा- Solapur News : विमानाने यायचा, चोरी करुन निघून जायचा; कोट्यधीश चोरट्याला सोलापुरात बेड्या)
त्यावेळी निवृत्ती तांगडे यांनी मौजपुरी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी कलम 309 (04), 140(2),351(2) (3),3(5) 310(2) कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा तपास सुरु केला. या प्रकरणी पोलिसांनी गणेश श्रीखंडे, रामप्रसाद ऊर्फ बाळु शिंदे, आकाश घुले, विशाल डोंगरे, आकाश रंधवे या आरोपींना अटक केली आहे . पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ कार देखील जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.