31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी कोकणातून सुसाट प्रवास; नाताळ, नववर्षात विमानप्रवास स्वस्त

ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात विमानसेवेने मोठी घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरु दळवी, प्रतिनिधी

Convenience fee Off : फ्लाय९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील सुविधा शुल्क (Convenience fee) माफ करण्याची घोषणा केली आहे. घरगुती हवाई प्रवासातील वाढती मागणी आणि उद्योगातील सुरू असलेल्या कार्यात्मक अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत प्रवासी कोणत्याही उपलब्ध (आगामी) तारखेसाठी तिकिटं आरक्षित करू शकतात. त्यामुळे त्यांना थेट आर्थिक बचत होईल. शिवाय सणासुदीच्या प्रवासाचे नियोजन अधिक सहज, सोपे आणि निर्विघ्न होईल. सुविधा शुल्क रद्द करण्यामागील विमानसेवेचा उद्देश म्हणजे ग्राहक-प्रथम दृष्टीकोन अधोरेखित करणे, तसेच तिकीट दरांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे असा आहे. प्रवाशांच्या अनुभवाला खऱ्या अर्थाने मूल्य देणे हेच आमचे कायमचे प्राधान्य राहिले आहे. सध्या हवाई उद्योगासमोर उभ्या असलेल्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही सणासुदीच्या काळात प्रवाशांना तणावरहित आणि सहज नियोजनाची सुविधा मिळावी, यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितलं.

Advertisement

www.fly91.in या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीटं सुविधा शुल्काशिवाय बुक करता येईल. उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA), मोपा येथून कार्यरत असलेली प्युअर प्ले रिजनल एअरलाईन फ्लाय९१ भारतातील टियर-२ आणि टियर-३ शहरांना प्रमुख केंद्रांशी विश्वासार्ह शॉर्ट-हॉल उड्डाणांद्वारे जोडत झपाट्याने विस्तारत आहे. गोव्यात मुख्यालय असलेली ही कंपनी जळगाव, सिंधुदुर्ग, अगत्ती (लक्षद्वीप), पुणे, सोलापूर, हैदराबाद आणि बंगळुरू यांसारख्या गंतव्यस्थानांदरम्यान सुलभ प्रवासाची सुविधा देते. प्रत्येक तिकीटामागे ग्राहकांची २२० रुपयांची बचत होईल. 

नक्की वाचा - Pune News : शिवरायांच्या सिंहगडावर संतापजनक कृत्य; गाडीच्या तपासणीदरम्यान आढळलं...

चिपी (सिंधुदुर्ग) ते हैदराबाद : 
आठवड्यातून ७ दिवस सेवा
वेळ: सुटणार दुपारी २.०५ मिनिटे (सिंधुदुर्ग ते हैदराबाद) 
पोहोचणार : दुपारी ३.५० मिनिटे 
तिकीट दर : सिंधुदुर्ग-हैदराबाद २९९३ रु. 

चिपी (सिंधुदुर्ग) ते पुणे: 
आठवड्यातून ७ दिवस सेवा, वेळ: सुटणार सकाळी १०.२५ मिनिटे (सिंधुदुर्ग ते पुणे) पोहोचणार: सकाळी ११.३५ मिनिटे 
तिकिट दर: सिंधुदुर्ग-पुणे : २९५२ रु.

चिपी (सिंधुदुर्ग) ते बंगळुरू 
आठवड्यातून ७ दिवस सेवा
वेळ: (सुटणार) सकाळी ९.५० मिनिटे (सिंधुदुर्ग ते बंगळुरू) पोहोचणार: सकाळी ११.३० मिनिटे 
तिकीट दर : २६९१ रु.

Advertisement

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world