गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या

Crime News: भुसावळ शहरामध्ये दोन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कोणत्या कारणामुळे करण्यात आली हत्या?

Advertisement
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

भुसावळ शहरामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञाताने गोळीबार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (29 मे 2024) रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये या दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जळगावमधील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान रुग्णालय परिसरामध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याने खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा : प्रज्वल रेवन्नाच्या टायमिंगची चर्चा, ज्योतिषाच्या सल्ल्याने आत्मसमर्पणासाठी 31 मे तारीख निवडली?)

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार,"बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मेरी माता मंदिराजवळ माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे कारमध्ये असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. दोघांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषिक केले. या दोघांची हत्या का करण्यात आली? हत्या करण्यामागे कोणाचा हात आहे? या सर्व गोष्टींचा तपास करण्यात येत आहे".

(नक्की वाचा : अदलाबदल भोवली, पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर मोठी कारवाई)

(नक्की वाचा : गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांची धाड; 3 कोटींचा मुद्देमाल जप्त)

Pune Drunk And Drive Case | NDTV मराठी स्पेशल : पुण्याचं पाताललोक