Gadchiroli News: दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलिसांचे ऑपरेशन अद्यापही सुरू

या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान (anti-Naxal operation) सुरू असून, पोलीस आणखी शोध घेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Anti Naxal Operation: नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र होत चालली आहे (फोटो प्रातिनिधीक)
गडचिरोली:

मनीष रक्षमवार

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरोधात पोलीस दलाचे अभियान अधिक तीव्र झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या एका चकमकीत पोलिसांनी 2 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ही कारवाई गट्टा पोलीस स्टेशन आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या संयुक्त पथकाने केली. या कारवाईत एक स्वयंचलित एके-47 रायफल (AK-47 rifle), एक अत्याधुनिक पिस्तूल (pistol), जिवंत दारुगोळा (live ammunition) आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

नक्की वाचा: जिल्हा परिषद शाळेत आता 'नो मोअर बॅक बेंचर्स' पद्धत, काय आहे हा केरळ पॅटर्न?

मोडस्केच्या जंगलात चकमक

एटापल्ली तालुका येथील पोलीस स्टेशन गट्टा जांबिया अंतर्गत येणाऱ्या मौजा मोडस्के जंगल परिसरात गट्टा दलमचे काही माओवादी दबा धरून बसले असल्याबाबत माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. यानंतर अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली C 60 ची पाच पथके अहेरी येथून रवाना करण्यात आली. गट्टा जांबियाचे पोलीस पथक आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली होती. दरम्यान शोध मोहीम राबवत असताना, अचानक नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी पोलीस पथकाने चोख प्रत्युत्तर देत त्यांना जशास तसे उत्तर दिले.

नक्की वाचा: महिला पोलिसाला चावली, मराठी आणि परप्रांतीय कुटुंबामधील वादाने गाठलं टोक

नक्षलवाद्यांकडे सापडल्या एके-47 रायफल

या चकमकीनंतर परिसराची झडती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांना 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्याकडून एक स्वयंचलित एके-47 रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान (anti-Naxal operation) सुरू असून, पोलीस आणखी शोध घेत आहेत. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Topics mentioned in this article