Pune Manache Ganpati : पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची मिरवणूक अन् पाणप्रतिष्ठापनेची वेळ ठरली, पाहा यादी!

Pune Manache Ganpati List : पुण्यातील मानाच्या 5 गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची (pune manache ganpati pratishtha) आणि मिरवणुकीची वेळ निश्चित झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ganesh Chaturthi 2025 : गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 27 ऑगस्ट रोजी देशभरातील गणपती विराजमान होतील. पुण्यातील मानाच्या 5 गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची (pune manache ganpati pratishtha) आणि मिरवणुकीची वेळ निश्चित झाली आहे. यंदाही पुण्याच्या मानाच्या गणपती मिरवणुकीला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या दिवशी पोलिसांकडून अधिक काळजी घेतली आहे. पाचही मानाच्या गणपतीच्या पालख्यांची मिरवणूक वेळेत निघणं आवश्यक आहे. त्यामुळे मिरवणुकीची आणि प्राणप्रतिष्ठेची वेळ देण्यात आली आहे. (Pune Manache Ganpati List)

मानाचा पहिला कसबा गणपती -

मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी 8 वाजता सुरू होईल. मिरवणुकीत प्रभात बँड पथकासह ढोलताशा पथकसुद्धा वादन करतील. सकाळी 11.37 मिनिटांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते संपन्न होईल.

मिरवणुकीची वेळ - सकाळी 8 वाजता
प्राणप्रतिष्ठेची वेळ - सकाळी 11.37

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ - 

यंदाचे हे मंडळाचे 133 वे वर्षे आहे. आगमनाची मिरवणूक सकाळी 10 वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरून निघेल. दुपारी 12.11 वाजता सनई-चौघड्याच्या साथीने प्राणप्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षी साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिलं कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या प्रतिकृती मंडळाकडून साकारण्यात आली आहे.

मिरवणुकीची वेळ - सकाळी 10 वाजता
प्राणप्रतिष्ठेची वेळ - दुपारी 12.11 वाजता

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ -

पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे यंदाचे 139 वे वर्षे असून बापाच्या आगमनाची मिरवणूक आकर्षक फुलांच्या रथातून बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल. प्रतिष्ठापना दुपारी 2 वाजून 34 मिनिटं यावेळी संपन्न होणार आहे.

Advertisement

मिरवणुकीची वेळ  - सकाळी 11 वाजता
प्राणप्रतिष्ठेची वेळ  -  दुपारी 2 वाजून 34 मिनिटं

नक्की वाचा - Pune News : पुण्यात दारूबंदी; गणेशोत्सवासाठी प्रशासनाचं मोठं पाऊल, मिरवणूक मार्गांवरील दारूची दुकानेही बंद

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ -

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षे असून बुधवारी दुपारी 12.15 वाजता आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. तुळशीबाग मंडळाकडून यंदा मथुरेचे वृंदावन साकारले आहे.

Advertisement

​​​​​​​प्राणप्रतिष्ठेची वेळ  - दुपारी 12.15 वाजता
​​​​​​​

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा -

सकाळी 9 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुरुवात होईल. सकाळी 10 ते 11 यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी 11 वाजता बाप्पाच्या महाआरतीचे नियोजन

मिरवणुकीची वेळ  - सकाळी 9 वाजता
​​​​​​​प्राणप्रतिष्ठेची वेळ  -  सकाळी 10 ते 11 दरम्यान