Thane Station Konkan Express : कोकणात जाण्यासाठी 25 तास वेटिंग; गणेशभक्तांचे हाल, स्थानकात तुडुंब गर्दी

तब्बल 24 तास गणेश भक्तांना रेल्वे स्थानकावर थांबावं लागत आहे. त्यामुळे गणेशभक्तांचे मोठे हाल होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, प्रतिनिधी

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणवासीयांची गणेशोत्सवाला जाण्यासाठी धावपळ सुरू  आहे. कोकणवासीयांना रस्त्यांवर खड्डे, वाहतूक कोंडी, एक्सप्रेसला तुडुंब गर्दी अशा सर्व संकटाचा सामना करावा लागत आहे. इतकच नाही तर तब्बल 24 तास गणेश भक्तांना रेल्वे स्थानकावर थांबावं लागत आहे. त्यामुळे गणेशभक्तांचे मोठे हाल होत आहेत.

ठाणे स्थानकावरुन एक्स्प्रेसने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना हाल सहन करावे लागत आहे. ठाणे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस यांचा समावेश होतो. बहुतांश कोकणवासी या एक्स्प्रेसमधून जात असतात. मात्र या गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. 

नक्की वाचा - Bus Fire : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या लक्झरी बसला भीषण आग, मोठा आवाज झाला अन् बस धडाधडा पेटली

गणेश भक्तांचे ठाणे स्थानकावर 24 तास वेटिंग

गणपती सण साजरा करण्यासाठी कोकणाला जाणारे चाकरमान्यांचा ठाणे स्टेशनवर 24 तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. 27 ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे. त्यापूर्वी मुंबई-ठाणे आणि नवी मुंबईतून अनेक कोकणवासी कोकणात रवाना होत असतात. पण ठाणे स्थानकात त्यांचे हाल होत आहेत. जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी 24 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. यापूर्वीपर्यंत जनरल डब्ब्याचं तिकीट घेऊन प्रवास करणं शक्य होतं, परंतू आता जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी रांग लावण्यासाठी गणेशभक्तांना 24 तास आधीच स्थानकावर यावं लागत आहे. 

Advertisement

त्यामुळे अनेक कुटुंब आपल्या मुला-बाळांसह 24 तास आधीच ठाणे स्थानकावर यावं लागत आहे. मात्र स्थानकावर काही सोई-सुविधा नसल्याची तक्रार महिलांकडून केली जात आहे. 24 तास स्थानकावर बसणं कठीण आहे. येथे काही सुविधा नसल्याचंही महिलांनी सांगितलं. त्यामुळे रेल्वेने जास्तीत जास्त जनरल डबे जोडावे अशी मागणी केली आहे.