DJ चा कहर? आवाजामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा दावा, तीन जण जखमी

डीजेच्या आवाज हा प्रचंड असतो. याच्याच धक्क्याने एका 37 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयाने केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
परभणी:

गणेश विसर्जनसाठी वाजवल्या जाणाऱ्या डिजे मुळे एकाचा जीव गेल्यीच धक्कादायक घटना घटली आहे. ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं घडली आहे. डीजेच्या आवाज हा प्रचंड असतो याच्याच धक्क्याने एका 37 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयाने केला आहे.तर या आवाजाने तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. मात्र डिजे मुळे झालेल्या या घटनेमुळे त्याचा वापर करायचा की नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गणेणरायाचे विसर्जन मंगळवारी सर्वत्र झाले. त्यावेळी मोठमोठ्या विसर्जन मिरवणूकाही निघाल्या. काही ठिकाणी ढोल ताश्यांच्या गजरात तर काही ठिकाणी डिजेंच्या दणदणाट होता. डिजेवर बंदी घावावी याची मागणी ही अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणूकां आधी केली होती. त्यामुळे काही ठिकाणी राज्यात डिजेवर बंदी होती तर काही ठिकाणी परवानगी होती. त्यामुळे तरूणाईसाठी डिजेवर या मिरवणूकांमध्ये थिरकण्याची संधी मिळाली. पण डिजेचा दणदणात काहींच्या जिवावर बेतला आहे. अशीच एक घटना जिंतूरमध्ये घडली आहे. 

ट्रेंडिंग - लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या पेजर्समध्ये स्फोट, 1000 हून जास्त जणं जखमी

राज्यात ज्या प्रमाणे गणेश विसर्ज मिरवणूका निघाल्या त्याच प्रमाणे जिंतूरमध्येही निघाल्या होत्या. या मिरवणूकांमध्ये डिजेच्या तालावर तरूणाई थिरकत होती. यात संदीप विश्वनाथ कदम ही सहभागी झाले होते. त्यांचे वय 37 होते. मिरवणुकी दरम्यान डिजेचा आवाज इतका मोठा होता की कदम यांना तो सहन झाला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना होत नाही तर अन्य तिघे जण या आवाजाने जखमी झाले. त्यात शिवाजी कदम,शुभम कदम, गोविंद कदम यांचा समावेश आहे. त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

ट्रेंडिंग बातमी - 'भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर....' गिरीश महाजनांनी सांगितलं एकच नाव

दरम्यान दुसरीकडे कोल्हापूरातही पोलीसांनी शेवटी डिजे बारानंतर बंद केले. कोल्हापुरात सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट होता.रात्री बारा वाजता सर्व डॉल्ब बंद झाले. न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री बारा वाजता सुरू असणारा डॉल्बीचा दणदणाट रोखला गेला. या विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई  डॉल्बी लावण्यात लावले होते. दरम्यान महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी होती. काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लठीचार्ज देखील केला. तर हुल्लडबाज तरुणांना खाकी दम देखील दिला. या मिरवणुकीत लहान मुले हरवल्याचेही प्रकार झाले. त्यामुळे काही नागरिकांची तारांबळ देखील उडाली. बारा वाजता न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी डॉल्बी सह सर्व वाद्य बंद करून विसर्जन मिरवणूक पुढे सोडली.