
लेबनानच्या राजधानीत अमेरिकेद्वारा घोषित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहवर (Hezbollah members) निशाणा साधत हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या हजारो पेजरमध्ये स्फोट करण्यात आला आहे. या घटनेत एक हजारांहून जास्त जणं जखमी झाले आहेत. अमेरिका आणि युरोपीय संघाने हिजबुल्लाहवर प्रतिबंध लावले आहेत. लेबनानमधील राजकीय आणि लष्करी आस्थापनांना इराणचा पाठिंबा आहे. पेजर स्फोटात इराणचे राजदूतही जखमी झाले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिजबुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्त्रायलला दोषी ठरवलं आहे. या सर्व पेजरमध्ये एकाच वेळी स्फोट झाल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी समूह हमासने 7 ऑक्टोबर 2024 रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर गाझा युद्ध सुरू झालं. तेव्हापासून हिजबुल्लाहने आपला सहयोगी हमासच्या समर्थनार्थ इस्रायलवर हल्ले केले आहेत. (Explosions in pagers of Hezbollah)
नक्की वाचा - "तुमचे रेकॉर्ड तपासा...", भारतीय मुस्लिमांबाबतच्या वक्तव्यावरुन भारताचं ईराणच्या सर्वोच्च नेत्याला प्रत्युत्तर
मात्र इस्त्रायलच्या सैन्याने या स्फोटाबाबत काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने सांगितलं की, लेबनानमध्ये इराणी राजदूत मोजतबा अमानीदेखील जखमी झाले आहेत. सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झालेले पेजर लेटेस्ट मॉडेलचे होते. हिजबुल्लाहने हे पेजर त्यांच्या समुहाच्या सदस्यांना दिले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world