Konkan Railway Ro Ro Service For Cars: लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सध्या लगबग जोरात सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणासाठी कोकणवासीय कोकणात आपल्या गावाकडे निघाले आहेत. गावी जाणाऱ्या कोकणवासियांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्यांची सोय केली आहे. यामध्ये कोकण रेल्वेने विशेष कार ऑन रोल सेवाही उपलब्ध करुन दिली. मात्र कोकण रेल्वेच्या या रो रो सेवेला अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळत असून पहिल्या दिवशी फक्त पाच गाड्या कोकणात रवाना झाल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची सोय व्हावी म्हणून कोकण रेल्वेने विशेष कार ऑन रोल ही विशेष योजना सुरु केली. शनिवारी या सुविधेचा शुभारंभ झाला. मात्र पहिल्याच दिवशी या सेवेला अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यामुळे ही रो रो सेवा बंद होतेय की काय? अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.
Ratnagiri News: चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला, वाहतूक ठप्प; गावी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल
शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी 5 वाहने घेऊन कोकण रेल्वेची पहिली गाडी कोकणाकडे निघाली. ज्या पद्धतीने कोकण रेल्वेतून ट्रक, टँकर वाहून नेले जातात तशीच ही सेवा देण्यात येत आहे. मात्र प्रवाशांनी या सेवेचे स्वागत केले असले तरी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही सेवा बंद होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही कोकण रेल्वेच्या वतीने सांगितल्याची माहिती आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द वाहन क्रमांक व प्रवासाच्या तपशीलासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडी अथवा कार्यालयाच्या व्हॉटसअप क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असं आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केलं आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या लक्झरी बसला भीषण आग, मोठा आवाज झाला अन् बस धडाधडा पेटली